HomeमनोरंजनTula Japnar Ahe : काय सांगता? प्रोमो शूटसाठी 12 तास पाण्यात उभी...

Tula Japnar Ahe : काय सांगता? प्रोमो शूटसाठी 12 तास पाण्यात उभी राहिली अभिनेत्री

Subscribe

अलीकडेच ‘तुला जपणार आहे’ या मालिकेचा नवीन प्रोमो प्रदर्शित झाला आहे. हा प्रोमो पाहून प्रेक्षकांमध्ये मालिकेबाबत चर्चा सुरु झाली आहे. टेलिव्हिजनवर काही तरी वेगळं पहायला मिळणार म्हणून आता प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. हा प्रोमो पाहिल्यावर समजतं एखादी मालिका सुरू झाल्यापासून ती प्रेक्षकांच्या घराघरात पोहचेपर्यंत टीम किती मेहनत घेते. या प्रोमो शूट दरम्यानचा एक किस्सा नुकताच मालिकेत मीरा ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री महिमा म्हात्रेने सांगितलं आहे. (Tula Japnar Ahe Know the story behind promo shoot)

काय आहे प्रोमो?

‘तुला जपणार आहे’ या मालिकेच्या नव्या प्रोमोत एका लहान मुलीला एक बाई पाण्यात ढकलताना दिसतेय. आपली मुलगी पाण्यात पडताना एक आई तिथे असूनही तिची मदत करू शकत नाही, तिचा हा हतबलपणा भावनिक करून जातो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

पण इतक्यात तिथे एक तरुणी येते आणि विचार न करता पाण्यात उडी मारून त्या लहान मुलीचा जीव वाचवते. हे दिसतं तितकं सोपं नाही. त्यामुळे हा सीन शूट करण्यामागे संपूर्ण टीमची किती मेहनत लागली असेल याचा अंदाज लावणे कठीणच!

पाण्यात उडी मारून श्वास रोखून..

मालिकेच्या प्रोमोविषयी बोलताना अभिनेत्री महिमा म्हात्रेने म्हटले, ‘या मालिकेचा तिसरा प्रोमो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. कारण प्रोमोमध्ये वेदा पाण्यात पडते हा सीन आम्ही साताऱ्यात शूट केला. जवळपास 13 ते 14 फूट पाण्यात उडी मारून श्वास तोखने आणि त्यातही चेहऱ्यावरचे हावभाव दाखवणे कठीण होते. जेव्हा आम्ही रिहर्सल केली तेव्हा माझ्या अंगावर 6 किलो वजन बांधल होतं. शूटच्या दिवशी मी जवळपास 11 ते 12 तास पाण्यात होते. त्यात हिवाळा होता आणि त्यामुळे प्रचंड थंडी होती. प्रोमोचे शूट जेव्हा पूर्ण झाले तेव्हा मी एक चॅलेंज पूर्ण केलं असं मला वाटत होतं’.

पुढे म्हणाली, ‘त्यादिवशी प्रोमो तर शूट झाला पण दुसऱ्या दिवसानंतर मी आजारी पडले. पण आजारी पडूनसुद्धा मी दुसऱ्या दिवशी पुन्हा शूटिंगसाठी गेले. तेव्हा माझ्यात ते बळ कुठून आलं? याची खरोखरचं मला स्वतःला कल्पना नाही. आज जेव्हा हा प्रोमो पाहते तेव्हा मला मनोमन खूप आनंद होतो. आपण केलेल्या मेहनतीचं कुठेतरी चीज झालं याचा प्रत्यय येतो’. मायेची साद जेव्हा देवी ऐकते तेव्हा फक्त संरक्षण नाही तर चमत्कार घडतो अशी ही गोष्ट आहे. प्रत्येक आईच्या आपल्या बाळासाठी असलेल्या भावनांची गोष्ट म्हणजे ‘तुला जपणार आहे’. ही मालिका येत्या 17 फेब्रुवारी 2025 पासून लोकप्रिय वाहिनी झी मराठीवर सुरू होत आहे.

हेही पहा –

Hemant Dhome : शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या अभिनेत्याला हेमंत ढोमेने सुनावले