घरमनोरंजन'या' दिवशी राजनंदिनी येणार सरंजाम्यांच्या घरात

‘या’ दिवशी राजनंदिनी येणार सरंजाम्यांच्या घरात

Subscribe

‘झी मराठी’ वाहिनीवरील अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या ‘तुला पाहते रे’ मालिकेत दररोज नवनवीन ट्विस्ट येत आहेत. मालिकेचं उत्तम कथानक आणि कलाकारांचं अभिनय या गोष्टींमुळे ही मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. विक्रांत सरंजामे आणि इशा निमकर यांच्या लग्नानंतर मालिकेत बऱ्याच नवीन घडामोडी पाहायला मिळाल्या. आता राजनंदिनी कधी मालिकेत येणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. लवकरच राजनंदिनी इशा आणि विक्रांतच्या आयुष्यात एन्ट्री घेतली आहे.

Shilpa Tulaskar
शिल्पा तुळसकर

मालिकेत नवीन वळण

- Advertisement -

मालिकेने सध्या रंजक वळण घेतलं आहे. ईशाला विक्रांतचे सत्य कळले आहे.  विक्रांतच गजा पाटील आहे हे कळल्यावर ईशाला खूप मोठा धक्का बसला. त्याचप्रमाणे तीने आईसाहेबांच्या प्रॉपर्टीलाही नकार दिला आहे. याचा धक्का विक्रांतला बसला आहे. ईशाला या सगळ्यातून फक्त राजनंदिनीच मार्ग दाखवू शकते. विक्रांतची पहिली पत्नी राजनंदिनीची मालिकेत एण्ट्री कधी होणार याची प्रेक्षकांना आतुरतेने वाट पाहत आहेत.

लवकरच प्रेक्षकांना मालिकेत राजनंदिनीची एंट्री पाहायला मिळणार आहे. शिल्पा तुळसकर राजनंदिनीची भूमिका साकारणार आहे. शिल्पसोबत मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात देखील झाली आहे. ‘तुला पाहते रे’ मालितेच्या शीर्षकगीतात शिल्पाची झलक पाहायला मिळते. पण आता राजनंदिनीचं रहस्य काय आहे, तिच्यासोबत काय घडलंय, बंद खोलीचं काय रहस्य आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळण्यासाठी प्रेक्षकांना थोडीच वाट पाहावी लागणार आहे. तिच्या एंट्रीबद्दल बोलताना शिल्पा म्हणाली, “आतापर्यंत प्रेक्षकांनी या मालिकेवर खूप प्रेम केलं. आता मी लवकरच राजनंदिनीच्या भूमिकेत प्रेक्षकांना मालिकेत दिसेन, त्यामुळे विक्रांतचे सत्य, विक्रांत आणि राजनंदिनीची केमिस्ट्री आणि पुढील कथेचा उलगडा कसा होतो हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांनी न विसरता मालिका पाहत राहावी असं मी आवाहन करते.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -