HomeमनोरंजनTula Shikvin Changlach Dhada : अक्षराच्या जुन्या मित्राची झाली एण्ट्री

Tula Shikvin Changlach Dhada : अक्षराच्या जुन्या मित्राची झाली एण्ट्री

Subscribe

तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत भुवनेश्वरी, अक्षरा घराबाहेर राहत असल्याचं पुरेपूर फायदा घेत आहे. भुवनेश्वरी, अधिपती समोर स्वतःची चांगली छवी बनवून ठेवण्यासाठी अक्षरासोबत बोलायला जाते आणि तिथून आल्यावर ती अक्षरांनी न बोललेल्या गोष्टी अधिपतीला सांगून भडकावते.

दुसरीकडे अक्षराला आई-बाबा समजावतात की तिने लवकरात लवकर अधिपतीला भेटून प्रेग्नंसीची बातमी द्यावी. त्यावर अक्षरा ठरवते की संक्रांतीच्या दिवशी स्वत: जाऊन अधिपतीला भेटायचं. ती अधिपतीसाठी छान गिफ्ट तयार करते. अधिपतीने पण तिच्यासाठी छान साडी आणि हलव्याचे दागिने घेतले आहेत. दुर्गेश्वरी हे सर्व पाहून अधिपतीच्या साडीची पिशवी बदलते. मकरसंक्रांतीच्या निमित्ताने अक्षराला घरी घेऊन जायचं म्हणून अधिपती अक्षराच्या घरी येतो. पण घरात नेमकी इरा आहे. हीच संधी साधून इरा अक्षराविरुद्ध अधपतीला सगळी चुकीची माहिती देते. दुसरीकडे भुवनेश्वरीही अक्षराला दारातच अडवते.

घर सोडलं तसं नातं पण विसरा असं जेव्हा अक्षराला सांगते तेव्हा अक्षरा तिला चांगलाच पलटवार देते. पलटवार बघून भुवनेश्वरी अक्षरावर हात उचलते. ह्याच आठवड्यात अक्षराच्या जुन्या मित्राचीही एण्ट्री होणार आहे आणि ही व्यक्ती आल्यानंतर अक्षरा-अधिपतीमधला गैरसमजम आणखी वाढत जाणार आहे.

हेही वाचा : Me Versus Me Natak : मी व्हर्सेस मी लवकरच येणार रंगभूमीवर


Edited By : Prachi Manjrekar