तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरण, संशयीत आरोपी शीजान खानची जामीनावर सुटका

काही महिन्यांपूर्वी चर्चेत असलेल्या तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणातील संशयीत आरोपी शीजान खानला डिसेंबर 2022 मध्ये अटक करण्यात आली होती. तेव्हापासून शीजान खान पोलिसांच्या ताब्यात होता. अनेक जामीन अर्ज फेटाळल्यानंतर शेवटी तीन महिन्यानंतर शीजानची सुटका झाली आहे.

आज 4 मार्च 2023 रोजी शीजानला वसई न्यायालयातून जामीन मिळाला आहे. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर शीजानची सुटका करण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून शीजानच्या जामीनाचा अर्ज फेटाळला जात होता. त्याचे कुटुंबीय आणि वकील त्याला सोडवण्याचे अनेक प्रयत्न करत होते. अशातच त्याची सुटका झाल्याने त्याचे कुटुंबीय आनंदी झाले आहेत.

आत्महत्येपूर्वी झाला होता तुनिषा-शीजानचा ब्रेकअप

 

View this post on Instagram

 

A post shared by Tunisha Sharma (@_tunisha.sharma_)

‘अली बाबा: दास्तान-ए-काबुल’ या हिंदी मालिकेत तुनिषा आणि मुख्य भूमिका साकारत होते. मालिकेच्या सेटवर तुनिषा-शीजान एकत्र आले. तेव्हापासून त्यांचे प्रेमप्रकरण सुरु होते. मात्र, आत्महत्येपूर्वी दोघांचा ब्रेकअप झाला होता असं म्हटलं जात आहे. ब्रेकअपमुळे तुनिषाने आत्महत्या केल्याचा आरोप शीजानवर करण्यात आला होता.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी शीजानने आत्महत्या झाली त्यादिवशीचा घटनाक्रम पोलिसांना सांगितला होता. आत्महत्येच्या एक दिवस आधी तुनिषाने अन्नाचा एकही कण खाल्ला नाही, आत्महत्येच्या दिवशी देखील सेटवर तुनिषाने काही खाल्ले नव्हते. शीजानने तुनिषाला खाण्याचा आग्रह धरला, पण तिने नकार दिला, यावेळी शीजान शूटिंगसाठी मेकअप रुममधून बाहेर पडला. पण बराचवेळ झाला तुनिषा मेकअप रुममधून बाहेर न आल्याने शीजान पुन्हा तिथे आला. यावेळी त्याने मेकअप रुमचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण दरवाजा आतून लॉक होता. यावेळी त्याने तुनिषाला हाक मारली मात्र त्याने तिच्या हाकेलाही प्रतिसाद दिला नाही. यावेळी शीजानने इतर सहकाऱ्यांच्या मदतीने मेकअप रुमचा दरवाजा तोडला. तेव्हा तुनिषा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली, यावेळी शीजानने तुनिषाला रुग्णालयात नेले मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.


हेही वाचा :

WPL 2023 : कियारा आणि कृतीच्या जबरदस्त परफॉर्मन्सने होणार सोहळ्याची सुरुवात