घरमनोरंजनतुनिषाची आत्महत्या नसून हत्या?.... आईचे शीजान आणि त्याच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप

तुनिषाची आत्महत्या नसून हत्या?…. आईचे शीजान आणि त्याच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप

Subscribe

हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री तुनिषा शर्माने शनिवारी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. हिंदी वाहिनीवरील ‘दास्तान-ए-काबुल’ या मालिकेत ती मुख्य भूमिका साकरात होती. तिने मालिकेच्या सेटवरील मेकअप रुममध्ये गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. वसईच्या कामन परिसरातील एका स्टुडिओमध्ये ही घटना घडली आहे. तुनिषाच्या आत्महत्येनंतर संपूर्ण मनोरंजनसृष्टीला धक्का बसला आहे. शिवाय तिचे कुटुंबीय देखील पूर्णपणे खचून गेले आहेत. पोलिसांनी संशयित आरोपी शीजान खानला अटक केली आहे. दरम्यान, नुकत्याच काही वेळापूर्वी तुनिषाच्या आईने पत्रकार परिषद घेऊन शीजान आणि त्याच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप केले आहेत.

तुनिषाच्या आईने केले शीजानवर गंभीर आरोप

 

View this post on Instagram

 

A post shared by Tunisha Sharma (@_tunisha.sharma_)

- Advertisement -

पत्रकार परिषदेमध्ये तुनिषाच्या आईने शीजान आणि त्याच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत. तेव्हा त्या म्हणाल्या की, “शीजान आणि त्याच्या कुटुंबियांकडून तुनिषावर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकला जात होता. तसेच तिला बुरखा घालण्यासही सांगण्यात आला होता. शीजानच्या घरचे तुनिषाला मानसिक त्रास देत होते.शूटिंग सुरु झाल्यापासून मागील 2-3 महिन्यात तुनिषाच्या वागण्यात खूप बदल झाला होता. शीझान तुनिषाला त्याच्या घरी घेऊन जायचा. शिवाय शीजानचे दुसऱ्या मुलीबरोबर संबंध असूनही शीजानने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं तो तुनिषाला महागड्या भेटवस्तू द्यायचा. तुनिषा शीजानवर प्रचंड प्रेम होती तरीही त्याने तिच्यासोबत ब्रेकअप केला. शिवाय ब्रेकअप केल्यानंतर तिला तुला जे हवं ते कर असं देखील म्हणाला. तुनिषा शीजानपेक्षा दहा वर्षांनी लहान होती. तुनिषा मानाने खूप भावनिक होती हा धक्का दिला सहन झाला नाही.”

तुनिषाची आत्महत्या नसून हत्या?
तुनिषाची आई म्हणाली की, आत्महत्येच्या काही तास आधी तुनिषा आणि त्यांचं बोलण झालं होतं. त्यावेळी ती ख्रिसमस पार्टीसाठी 2 दिवस बाहेर जाणार असल्याचं म्हणाली होती शिवाय त्यावेळी ती खूप खूश होती. मग असं असताना अचानक तिच्या मनात आत्महत्येचा विचार कसा आला? कदाचित ही आत्महत्या नसून हत्या देखील असू शकते.

- Advertisement -

हेही वाचा :

तुनिषाच्या आत्महत्येत शीजानला आरोपी ठरवणं चुकीचं… उर्फी जावेदकडून पाठराखण

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -