घरताज्या घडामोडीNakul Mehta: टीव्ही अभिनेता नकुल मेहता कोरोना पॉझिटिव्ह

Nakul Mehta: टीव्ही अभिनेता नकुल मेहता कोरोना पॉझिटिव्ह

Subscribe

मी लवकरच यातून बाहेर येईल

सध्या बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी कोरोनाच्या विळख्यात आले आहेत. करिना कपूर नंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यातच आता मालिकेच्या छोट्या पडद्यावरीव प्रसिद्ध कलाकार बडे अच्छे लगते हे फेम अभिनेता नकुल मेहताला कोरोनाची लागण झाल्याची झाली आहे. नकुलने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती त्याच्या चाहत्यांना दिली. नकुलने त्याच्या औषधांचा फोटो शेअर करत तो सध्या होम क्वारंटाइन असल्याचे सांगितले.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Nakuul Mehta (@nakuulmehta)

- Advertisement -

नकुलने शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्याची औषधे दिसत आहेत. नकुल सध्या होम क्वारंटाइन असून लॅपटॉपरवर सिनेमा पाहत वेळ घालवत आहे. नकुलने त्याच्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे, ‘मी आज कमी फॉगी फिल करत आहे. लवकरच हेल्थ अपटेड येईल. विल स्मिथ, औषधे, नेटफ्लिक्सवर यू, स्पॉटीफाइवर मॉर्डन लव पॉडकास्ट, अली शेठ यांचा आवाज, काही क्रिस्मस लाइट्स, माझी डायरी आणि घरचं गरमा गरम जेवण. कोरोनाला हरवण्यासाठी मी हे सगळ करत आहे त्यामुळेसगळ्यांचे आभार. मी लवकरच यातून बाहेर येईल’.

- Advertisement -

नकुल मेहता नुकताच बडे अच्छे लगते है या मालिकेत अभिनेत्री दिशा परमार सोबत दिसला होता. मीडिया रिपोर्टनुसार हा शो लवकरच ऑफ एअर होणार आहे. मात्र नकुलने एका मुलाखतीत शो ऑन एअरच राहणार आहे असे सांगितले. बडे अच्छे लगते हे या मालिकेचा हा दुसरा भाग आहे. पहिल्या सीझनमध्ये अभिनेता राम कपूर आणि साक्षी तंवर यांनी मुख्य भूमिका केल्या होत्या. पहिला सीझन जवळपास ३ वर्ष सुरू होता मात्र दुसऱ्या सीझनला प्रेक्षकांनी हवा तसा प्रतिसाद दिला नाही.


हेही वाचा – श्रीदेवी ‘लुक अ लाईक’ने उडवली नेटकऱ्यांची झोप, व्हिडीओ व्हायरल

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -