घरट्रेंडिंगपॉर्नस्टारला डेट करतेय ऐकल्यावर आईने तोडले संबंध, पण 'मातृदिना' ठरला खास

पॉर्नस्टारला डेट करतेय ऐकल्यावर आईने तोडले संबंध, पण ‘मातृदिना’ ठरला खास

Subscribe

आज सगळेचजण लॉकडाऊन असलं तरी मातृदिन साजरा करत आहेत. कोणी आईसाठी काहीतरी स्पेशल करतय तर कोणी जून्या आठवणीत रमलय. पण टिव्ही अभिनेत्री माहिका शर्मा आजच्या दिवशी प्रचंड खूश आहे. कारण दोन वर्षापासून तीची आई तीच्याशी बोलत नव्हती. पण आज दोन वर्षानंतर तीच्या आईने तीच्या बोलायला सुरूवात केली आहे. २०१८मध्ये महिकाच्या आईने तीच्याशी बोलणं टाकलं होतं. आता दोन वर्षानंतर माहिकाच्या आईने माहिकाला फोन केला. माहिका सध्या लॉकडाऊनमुळे लंडनमध्येच अडकली आहे.

View this post on Instagram

Early in the morning..

A post shared by Mahika Sharma (@memahikasharma) on

- Advertisement -

माहिका म्हणाली, दोन वर्ष वाट बघितल्यानंतर आज आईचा फोन आला. आता आमच्या नात्यातही सुधारणा झाली आहे. माहिका म्हणते, कोरोना व्हायरसने आई- मुलीला जवळ आणलं आहे. कोरोनाने आपल्या आईला जवळ आणायला मदत केली आहे.

- Advertisement -

माहिका म्हणाली, माझ्या आईने दोन वर्षापूर्वी सर्व संबंध तोडले होते. आईने मला प्रत्येक ठिकाणी ब्लॉक केलं होतं. अगदी सोशल मीडियावरसुध्दा. जेव्हा माझ्या आईला समजल त्यांची मुलगी एका पॉर्न स्टारला डेटिंग करत आहे.  पण हा फक्त गैरसमज होता. मी आईला स्पष्ट केलं होतं की, मी फक्त त्यांच्याबरोबर एक चित्रपट करत आहे. त्यावेळी मी आईला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. पण आईने तेव्हा ऐकलं नाही. पण आता जसा वेळ गेला. तसं आईला हे पटलं आहे. आज मातृदिना दिवशी आईचा फोन आला हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं.


हे ही वाचा – सकाळी कोरोनाचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह आणि संध्याकाळी….


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -