घरमनोरंजन'या' टीव्ही अॅक्ट्रेसचा पतीवरच लैंगिक शोषणाचा आरोप

‘या’ टीव्ही अॅक्ट्रेसचा पतीवरच लैंगिक शोषणाचा आरोप

Subscribe

अभिनेत्री चाहत खन्नाने तिच्या पूर्व पतीवर केलेल्या शारिरीक आणि मानसिक शोषणाच्या आरोपामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत

टेलिव्हीजन अभिनेत्री चाहत खन्ना हिने आपल्या पूर्व पतीवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. चाहतच्या नवऱ्याचं नाव शाहरुख मिर्जा असून, तो बॉलीवूडमध्ये लेखक आहे. एकता कपूरची लोकप्रिय मालिका बडे अच्छे लगते है या मालिकेतून चाहत खन्ना खऱ्या अर्थाने घराघरात पोहोचली, लोकप्रिय झाली. मात्र, आता चाहतने केलेल्या या गंभीर आरोपामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. चाहत खन्नाने २०१३ मध्ये शाहरुख मिर्जासोबत धुमधडाक्यात लग्न केलं होतं. या नव्या नात्यामुळे ती प्रचंड खूश होती. शाहरुख आणि चाहतला दोन गोंडस मुली आहेत. चाहत नेहमीच आपल्या पती आणि मुलींसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करायची. मात्र, अाता अचानक तिने आपल्या पतीवर लैंगिक शोषणसारखा गंभीर आरोप केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, एका इंग्रजी वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, खरंतर या सगळ्याची सुरुवात आधीपासूनच झाली होती. उपलब्ध माहितीनुसार, चाहत खन्नाचं मिर्जासोबतचं हे दुसरं लग्न होतं. चाहत आपल्या दुसऱ्या पतीसोबत आणि मुलींसोबत खुष असल्याचं तिने अनेकदा सांगितलंही होतं. मात्र, आता चाहतने शाहरुख मिर्जावर केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर तिचं दुसरं लग्नही अयशस्वी ठरलं असंच म्हणावं लागेल.

चाहत खन्ना आपल्या फॅमिलीसोबत

या वेबसाईटच्या माहितीनुसार, चाहत खन्नाने मध्यंतरी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन मुलींसोबतचा एक फोटो शेअर केला होता. ‘माझ्या आयुष्याचे एकच ध्येय आहे, की मी तुमचे आयुष्य परीप्रमाणे बनवू’, अशा अर्थाचं कॅप्शन तिने या फोटोला दिलं होतं. मात्र, उल्लेखनीय बाब म्हणजे हा फोटो शेअर करतेवेळी तिने टsingle mom’ हा हॅशटॅग वापरला होता. यातून कुठेतरी ती एकटीच आपल्या मुलींचा सांभाळ करत असून, तिचं वैवाहिक आयुष्य सुखी नसल्याचा अंदाज लावण्यात आला होता. त्यातून हे चाहत खन्नाचं दुसरं लग्न असल्यामुळे टीव्ही जगतात त्याविषयी अनेक चर्चा रंगत होत्या

- Advertisement -

त्यानंतर काही दिवसांतच चाहत आणि शाहरुख मिर्जा वेगळे झाल्याची बातमी समोर आली. चाहतने स्वत: एका मुलाखतीत या बातमीची पुष्टी दिली होती. मी माझ्या वैवाहिक आयुष्यात सुखी नसल्यामुळे मुलींसकट वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे, असंही खन्ना हिने सांगितलं होतं. मात्र, त्यानंतर आता अचानक तिने आपल्या पतीवर लैंगिक शोषणाचा आरोप लावल्यामुळे पुन्हा एकदा तिचं अयशस्वी लग्न चर्चेत आलं आहे. आता चाहत खन्नाने केलेल्या या आरोपांमध्ये किती तथ्य आहे? शाहरुख मिर्जा खरंच दोषी आहे का? हे येणारी वेळच सांगेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -