घरमनोरंजनशूटिंग दरम्यान सेटवरच कोसळली टीव्ही अभिनेत्री; आता व्हेंटीलेटरवर

शूटिंग दरम्यान सेटवरच कोसळली टीव्ही अभिनेत्री; आता व्हेंटीलेटरवर

Subscribe

एका वेबसीरिजच्या शूटिंगदरम्यान गहना अत्यावस्थ झाली. त्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. एवढेच नाही तर तिला सध्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

बीझी शूटिंग शेड्यूलमुळे चित्रपट, टीव्ही कलाकारांना सलग अनेक तास शूटिंग करावं लागतं. यामुळे अनेकदा कलाकारांच्या आरोग्यावर परिणाम होतो. असाच प्रकार घडला आहे टीव्ही अभिनेत्री गहना वशिष्ठ हिच्यासोबत. एका वेबसीरिजच्या शूटिंगदरम्यान गहना अत्यावस्थ झाली. त्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. एवढेच नाही तर तिला सध्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

- Advertisement -

काल २१ नोव्हेंबर रोजी मुंबई येथील मढ आयर्लंडवर अभिनेत्री गहना वेबसीरिजचं शूटिंग सुरु होतं. सलग ४८ तास शूट करणाऱ्या गहनाने कोणत्याही तज्ज्ञाच्या सल्ल्याशिवाय हे शूट सुरु ठेवले होते. यावेळी ती केवळ एनर्जी ड्रिंकवर होती. यावेळी तिला एग्जर्शन होऊन ती सेटवर कोसळली. अभिनेत्री गहनाला मधुमेहाचा त्रास आहे. तिची शुगर लेव्हल खूप जास्त असून बीपी लेव्हल खूपच कमी आहे. हॉस्पिटलमधील प्राथमिक उपचारांना तिने कोणताच प्रतिसाद दिला नाही. तसेच तिला श्वसनाचा त्रास सुद्धा होत होता. परिणामी तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

स्टार प्लसवरील मालिका ‘बहने’ या मालिकेत गहना प्रमुख भूमिकेत दिसली होती. याशिवाय गहनाने २०१२ मध्ये मिस एशिया बिकिनी ही स्पर्धा सुद्धा जिंकली होती. त्याबरोबरच गहनाने मागील ५ वर्षांमध्ये ३० हून अधिक साउथ सिनेमांमध्ये काम केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -