घरताज्या घडामोडीVideo: नेपोटिझमच्या मुद्द्यावरून सलमान भडकला, म्हणाला

Video: नेपोटिझमच्या मुद्द्यावरून सलमान भडकला, म्हणाला

Subscribe

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येच्या प्रकरणानंतर नेपोटिझमचा मुद्या फारच चर्चेत आला. आता हा मुद्दा सोशल मीडियानंतर लोकप्रिय शो बिग बॉसच्या घरापर्यंत पोहोचला आहे. दरम्यान बिग बॉस सीझन १४ चा सदस्य आणि गायक राहुल वैद्यने, प्रसिद्ध गायक कुमार सानू यांच्या मुलावर जान सानूवर नेपोटिझमच्या मुद्यावरून कमेंट केली होती. हाच मुद्या विकेंडच्या वारमध्ये भडकल्याचे पाहायला मिळत आहे.

विकेंडच्या वारच्या एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सलमान खान नेपोटिझमच्या मुद्द्यावरून भडकल्याने दिसत आहे. यासंदर्भात सलमान राहुल वैद्यला सुनावताना दिसत असून अनेक प्रश्न विचारले आहेत. जर माझे वडील माझ्यासाठी काही काम करत असेल तर ते नेपोटिझम आहे का? तुझा मुलगा गायक झाला तर त्याला नेपोटिझम बोलशील, असे अनेक प्रश्न सलमान खान राहुल वैद्यला विचारत आहे. त्यामुळे बिग बॉसचा आजचा विकेंडचा वार पाहण्यासारखा आहे. यामध्ये सलमानचे नेपोटिझम बद्दलचे नेमके मत काय आहे हे समजले.

- Advertisement -

या विकेंडच्या वारची छोटी क्लिप कलर्स टीव्हीने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. सध्या ही क्लिप चांगलीच चर्चेत आली आहे. ३ लाखांहून अधिक जणांनी ही क्लिप पाहिली आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून बिग बॉस शो चांगलाच चर्चेत आला होता. जान सानूच्या मराठी संदर्भातील वादग्रस्त विधानामुळे बिग बॉस शो वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. पण त्यानंतर कलर्स वाहिनीने आणि जान सानू यासंदर्भात माफी मागितली आहे.


हेही वाचा – सिंघम गर्लने आयुष्यातील नव्या प्रवासाला केली सुरुवात, पाहा लग्नाचे फोटो

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -