सिंदूर, हातात चुडा! Tejasswi Prakash अन् Karan Kundrra ने गुपचुप उरकलं लग्न?

tv tejasswi prakash seen in sindoor and bangles with karan kundrra fans asks shadi kab ki
सिंदूर, हातात चुडा! Tejasswi Prakash अन् Karan Kundrra ने गुपचुप उरकलं लग्न?

बिग बॉस 15 ची विजेती अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आजकाल तिच्या नागिन 6 या मालिकेमुळे चर्चेत आहे. या मालिकेत तेजस्वी प्राथा ही मुख्य भूमिकेत दिसतेय. एकीकडे तेजस्वीच्या नागिनची चर्चा असताना, दुसरीकडे ती करण कुंद्रासोबतच्या नात्यामुळे चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये जवळीक अधिक वाढली आहे. या दोघांना अनेकदा एकत्र डिनर डेट आणि मूव्हीदरम्यान स्पॉट करण्यात आलेय. बिग बॉस 15 च्या घरात दोघांनी एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त केले. दोघांची ही जोडी चाहत्यांनाही खूप आवडतेय. या जोडीला प्रेमाने तेजरान असे म्हटले जाते. आता चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

अलीकडेच तेजस्वी पुन्हा एकदा करण कुंद्रासोबत स्पॉट झाली. यावेळी तिचा लूक पाहून सगळेच अवाक् झाले. तेजस्वीचा हा लूक पाहून आता युजर्स विचारू लागलेत की, तिने करण कुंद्रासोबत केव्हा लग्नकेले? सध्या करण आणि तेजस्वीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओ पाहता दोघांनीही गुपचूप लग्न केल्याचे दिसते.

करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश मुंबईत स्पॉट करण्यात आलेय. यावेळी अभिनेत्रीने हिरव्या रंगाच्या साडी नेसली होती तर भांगेत सिंदूर आणि हातात बांगड्यांचा चुडा घातला होता. तेजस्वीचा हा लूक अगदी एका विवाहित महिलेप्रमाणे होता. दरम्यान चाहत्यांमध्ये आता दोघांनी लग्न केलं की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. दोघांनीही पती-पत्नी असल्याप्रमाणे कॅमेऱ्यासमोर पोज दिली. या दोन्ही लव्ह बर्डचे फोटो आणि व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. विरल भयानी या वेबसाईटने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

यावेळी प्रचंड गर्दी पाहून करण कुंद्राने एका बॉयफ्रेंडप्रमाणे तेजाचा हात घट्ट पकडला. त्याचवेळी तेजानेही नंतर करणला मिठी मारली. हा व्हिडीओ आता सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. चाहते या व्हिडिओवर उत्स्फूर्त कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘तुम्ही खरोखर तेजा आणि करण आहात का, तुम्ही दोघांनी एकमेकांसोबत लग्न केले आहे, भांगेत सिंदूर का आहे?’. दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘लाडू फक्त खायला आवडतात… दोघंही लवकर लग्न करा’. तर तिसऱ्या एका यूजरने लिहिले की, ‘मला दोघं खूप आवडतात..दोघेही खूप गोंडस आणि प्रेमळ आहेत.’

परंतु हे व्हिडीओ शूटिंगदरम्यानचे आहेत असे म्हटले जातेय. करण कुंद्राला चकित करण्यासाठी नागिन 6 च्या शूटिंग सेटवरून तेजस्वी प्रकाश ‘डान्स दिवाने ज्युनियर्स’च्या सेटवर पोहोचली होती. त्यामुळे साडीत प्रथेच्या लूकमध्ये दिसली. परंतु या व्हिडीओमुळे चाहत्यांचा गोंधळ उडाला आहे.


Sonam Kapoor च्या घरी चोरी; चोरट्यांनी १.४१ कोटींच्या रोकड आणि दागिन्यांवर मारला डल्ला