घरमनोरंजन‘अग्गबाई सुनबाई’मध्ये नवं ट्विस्ट, आसावरी समोर येणार सोहमचं सत्य! बघा वटपौर्णिमा स्पेशल...

‘अग्गबाई सुनबाई’मध्ये नवं ट्विस्ट, आसावरी समोर येणार सोहमचं सत्य! बघा वटपौर्णिमा स्पेशल भाग

Subscribe

‘झी मराठीवर वटपौर्णिमा हा सण मोठ्या उत्साहात पार पडणार असून काही मालिकांचे विशेष भाग देखील यावेळी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यापैकीच ‘अग्गबाई सूनबाई’ या मालिकेत आता नवा ट्विस्ट येणार आहे. ही मालिका सुरू झाल्यापासून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. ‘अग्गबाई सुनबाई’ मध्ये वटपौर्णिमेच्या पूजेत सोहम आणि सुझेनचं सत्य आसावरीसमोर येतं, चिडून ती शुभ्राला सांगते आज पासून तू सोहमचं नाव लावायचं नाहीस. तसंच ती शुभ्राला म्हणते कि ‘तुला असं का वाटलं कि मी तुझी सासू आहे, मी तुझी सासू नाही तर आई आहे, आणि तुझ्यावर झालेल्या अन्याया विरुद्ध मी तुला नक्की न्याय मिळवून देईन.’

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

- Advertisement -

शुभ्राची जागा बळकावण्यासाठी सुझॅन अनेक प्रयत्न करतेय. मात्र आता या मालिकेत नवं वळण आलं आहे. सोहम आणि सुझॅनचं नातं आता आसावरीच्या समोर येणार आहे. हा भाग आपल्याला वटपौर्णिमा विशेष भाग , २४ जून रात्री ८.३० वा. झी मराठीवर पाहता येणार आहे. यानंतर या मालिकेत आसावरी कोणत पाऊल उचलणार हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे. शुभ्रा सुझॅन आणि सोहमला कसं वठणीवर आणणार हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.

दुसरीकडे ‘पाहिले न मी तुला’ मालिकेत मनुची ही पहिली वटपौर्णिमा असणार आहे. मानसीचे  वटपौर्णिमेचे व्रत पूर्ण होवू नये म्हणून समर, भोपेच्या मदतीने अनेक अडथळे आणण्याचा प्रयत्न करतो. मात्र या सगळ्या अडथळ्यांवर मात करत मानसी हे व्रत पूर्ण करते आणि समरचा प्लान फसतो.


तारक मेहता का उल्टा चष्मा:दिव्यांका त्रिपाठीने दयाबेनची भूमिका करण्यास दिला नकार?
Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -