घरमनोरंजनट्विंकल खन्नाने केलं अभिनेता हृतिक रोशनचे कौतुक म्हणाली, माझा शेजारी लोकांची मदत...

ट्विंकल खन्नाने केलं अभिनेता हृतिक रोशनचे कौतुक म्हणाली, माझा शेजारी लोकांची मदत करत आहे…

Subscribe

हॉलिवूड कलाकारासोबत मिळून देशासाठी कोरोना व्हायरसच्या लढाईत सहभाग घेतला आहे. तसेच एका अभियानाअंतर्गत 27 कोटी रुपये जमा केले होते. नुकतच अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिने अभिनेता हृतिक रोशन याचे कौतुक केले आहे.

जगभरामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोना व्हायरसचे संकट कायम असताना आपुर्‍या सोयी सुविधे अभावी अनेक कोरोनारुग्ण दगावत आहेत. देशभरात कोरोना व्हायरसची गंभीर स्थिति पाहता अनेक बॉलिवूड कलाकार लोकांच्या मदतीसाठी धावून आले आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी अभिनेता हृतिक रोशन याने हॉलिवूड कलाकारासोबत मिळून देशासाठी कोरोना व्हायरसच्या लढाईत सहभाग घेतला आहे. तसेच काही दिवसांपूर्वी एका अभियानाअंतर्गत 27 कोटी रुपये जमा केले होते. नुकतच अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिने अभिनेता हृतिक रोशन याचे कौतुक केले आहे. ट्विंकलने हृतिक रोशनचा सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत लिहलं आहे की,” पुढे येऊन आपल्या शेजारील कोरोना महामारीशी लढणार्‍या व्यक्तींची मदत करा. या गंभीर परिस्थितीत माझे शेजारी राहणारा अभिनेता हृतिक रोशन लोकांची अनेक प्रकारे मदत करत आहे. हृतिक साठी जोरदार टाळ्या” तसेच ट्विंकल खन्ना हिने हृतिक कश्या व कोणत्या प्रकारची मदत करत आहे याचे पुर्णपणे स्पष्टीकरण दिले नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Twinkle Khanna (@twinklerkhanna)

- Advertisement -

वर्कफ्रंट बाबतीत सांगायचे झाल्यास हृतिक गेल्या वर्षी वाणी कपूर आणि टाईगर सोबत ‘वॉर’ चित्रपटात दिसला होता. तसेच हृतिक सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो तो नेहमी आपल्या चाहत्यांसोबत अनेक फोटो व्हिडिओ अपकमिंग प्रोजेक्टची माहिती देत असतो.


हे हि वाचा – अभिनेता सोनू सुदने चीन नंतर आता फ्रान्सकडून मागवले ऑक्सिजन प्लांट्स !

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -