अभी ना जाओ छोडकर गाणं आक्षेपार्ह?

'अभी ना जाओ छोडकर' या गाण्यामध्ये आक्षेपार्ह शब्द आहेत. तर तुम्ही विश्वास ठेवाल? पण, होय या गाण्यातील 'छोडकर' हा शब्द आक्षेपार्ह आहे.

Abhi na jao chodkar

१९६१ साली प्रदर्शित झालेल्या हम दोनो या चित्रपटातील ‘अभी ना जाओ छोडकर’ हे गाणं खूप गाजलं. आशा भोसले आणि मोहम्मह रफी यांनी गायलेल्या या गाण्यानं प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजवलं. शिवाय हे गाणं आज देखील अनेकजण गुनगुनताना दिसतात. पण तुम्हाला कुणी सांगितलं की, ‘अभी ना जाओ छोडकर’ या गाण्यामध्ये आक्षेपार्ह शब्द आहेत. तर तुम्ही विश्वास ठेवाल? पण, होय या गाण्यातील ‘छोडकर’ हा शब्द आक्षेपार्ह आहे. आता तुम्ही म्हणाला तुमचं डोकं फिरलंय का? ‘छोडकर’ हा शब्द आक्षेपार्ह कसा? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल नाही का? पण होय, ‘छोडकर’ हा शब्द आक्षेपार्ह असल्याचं गुगल असिस्टंटनं म्हटलं आहे. कारण जेव्हा गुगल असिस्टंटला अभी ना जाओ छोडकर हे गाणं वाजव असा आदेश दिला जातो तेव्हा गुगल असिस्टंट छोडकर या शब्दाला म्युट करतं.

याबद्दल सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहे. संबंधित कंपनीला जेव्हा याबद्दल विचारणा केलं गेलं तेव्हा कंपनीनं अलगोरितमचं कारण दिलं. त्यामुळे आम्ही अलगोरितम चेक करू असं देखील कंपनीनं म्हटलं आहे. पण, सध्या याबद्दल बरीच चर्चा रंगल्याचं पाहायाला मिळत आहे.