हिंदी आणि मराठीतील दोन सुपरस्टार्सनी लावली एकाच मंचावर हजेरी      

या कार्यक्रमाला हे दोन्ही कलाकार आलेले होते. या कार्यक्रमाचे आयोजन नम्मा होमिओपॅथीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. मोरे रघु प्रसाद यांनी केले होते

बॉलिवूडचा हिरो नंबर वन गोविंदा आणि मराठीतील चॉकलेट बॉय स्वप्नील जोशी यांनी आपले अभिनयकौशल्य आपल्या चित्रपटांतून सिद्ध केले आहे. या दोन्ही सुपरस्टार्सचा चाहता वर्ग मोठा आणि अफाट आहे. आता हे दोन्ही आघाडीचे कलाकार नुकतेच एका मंचावर उपस्थित होते. नम्मा होमिओपॅथीने होमिओपॅथिक वैद्यकीय सेवेच्या क्षेत्रात मिळवलेले यश साजरे करून आणि आनंदी रुग्ण आणि आनंदी डॉक्टरांच्या टीमला एकत्र आणण्यासाठी अंधेरी येथे एका भव्य कार्यक्रम आयोजन केले होते. या कार्यक्रमाला हे दोन्ही कलाकार आलेले होते. या कार्यक्रमाचे आयोजन नम्मा होमिओपॅथीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. मोरे रघु प्रसाद यांनी केले होते.

याच कार्यक्रमाच्या वेळेस अभिनेता गोविंदा आणि स्वप्नील जोशी यांनी उपस्थिती लावली आणि आपल्या भाषणातून उपस्थितांची मने जिंकली. या वेळी बॉलिवूडचा हिरो नंबर वन गोविंदा या कार्यक्रमाच्या वेळी स्टेजवर मराठी आणि हिंदीमध्ये सुमारे अर्धा तास बोलत होता. यावेळी त्याने होमिओपॅथी उपचार पद्धतीचे महत्त्व व फायदे सांगितले. तसेच अभिनेता स्वप्नील जोशीचे त्याने कौतुक केले.

तर या कार्यक्रमात स्वप्नील जोशीने सांगितले की, एकच हिरो नंबर वन आहे, आणि त्या कलाकाराचे नाव आहे गोविंदा. आज त्यांच्यासोबत या कार्यक्रमाचा एक भाग होणे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे.  नम्मा होमिओपॅथीने हजारो नव्हे तर लाखो रुग्ण बरे केले आहेत. मोरे रघुप्रसाद यांनी लाखो घरांमध्ये नवी आशा, नवे धैर्य आणि नवी ऊर्जा दिली आहे.

 


हेही वाचा :रेशम टिपणीस साकारणार ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ मालिकेत द्वारकाबाईंची भूमिका