Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन मनवा नाईकला धमकी देणाऱ्या उबर चालकाला अटक

मनवा नाईकला धमकी देणाऱ्या उबर चालकाला अटक

Subscribe

नुकत्याच एक-दोन दिवसांपूर्वी मनवा नाईकने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये मनवाने तिने एका गाडीचा नंबर आणि एका व्यक्तीचा फोटो शेअर केला होता. शिवाय याखाली कॅप्शन देत तिने तिच्याबरोबर घडलेला प्रकार सांगितला आहे. दरम्यान, मनवाच्या पोस्टची दखल पोलिसांनी घेतली असून त्या उबर चालकाला ताब्यात घेण्यात आलं आहे.

त्या उबर चालकाचं नाव मोहम्मद मुराद अजमअली इद्रिसी हे असून त्याचे वय 21 वर्ष आहे. मनवा नाईकसोबत गैरवर्तन आणि तिला धमकी दिल्या प्रकरणी त्याला पोलिसांनी अटक केली आहे.मनवाच्या पोस्टवर त्यांनी प्रतिक्रिया देत लिहिलं होतं की,”मनवा जी..आम्ही या घटनेची दखल घेतली आहे. Dcp झोन 8 यावर काम करत आहे. या चालकावर लवकरात लवकर गुन्हा दाखल करण्यात येईल”. मनवाने पोस्ट शेअर करताच सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.

- Advertisement -

उबर चालकाविरोधात गुन्हा दाखल
उबर चालक मोहम्मद मुराद अजमअली इद्रिसी याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्याविरोधात कलम 354 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच वाहन चालवताना फोनवर बोलणे आणि सिग्नल तोटल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हेही वाचा :

फेसबुक पोस्ट करून मनवा नाईकने सांगितला धक्कादायक प्रकार

- Advertisement -
- Advertisement -
shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -