बॉलीवूड संगीत विश्वातील प्रसिद्ध गायक उदित नारायण गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. एका लाईव्ह शोदरम्यान त्यांनी आपल्या चाहतीला किस केल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओतील गायकाचे कृत्य पाहून भल्याभल्यांची सटकली. सोशल मीडियावर ट्रोलिंगचं वादळ उठलं. प्रत्येकाने उदित नारायणला ट्रोल करण्याची संधी साधली. इतके होऊनही उदित काही थांबायचं नाव घेईना. नुकताच त्याचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झालाय. ज्यात त्याने पुन्हा एका महिला चाहतीला किस केल्याचे दिसून आले. यावरून नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा गायकाला फैलावर घेतलाय. (Udit Narayan again trolled for kissing another female fan)
.. जराही पश्चाताप नाही
उदित नारायणने लाईव्ह शोमध्ये एका चाहतीला किस केल्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. जो पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केलेला. या व्हिडिओवर अनेकांनी विविध प्रतिक्रिया देत गायकाच्या कृत्याचा निषेध केला होता. पण आता गायकाचा दुसरा व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यात त्याने पुन्हा एकदा महिला चाहतीला किस केल्याचे दिसून आले.
Another video of Udit Narayan pic.twitter.com/dYGWgPfUHl
— Savage SiyaRam (@SavageSiyaram) February 5, 2025
हा व्हिडीओ पाहून एकंदर उदित नारायणला त्याच्या कृत्याचा पश्चाताप नाही हे स्पष्ट दिसून येतंय. उलट ‘चाहत्यांसाठी आम्हाला हे करावं लागतं. तुम्ही याकडे दुर्लक्ष करा’, असे गायकाने म्हटले.
आम्हाला अशा गोष्टी कराव्या लागतात
मध्यंतरी व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर गायक प्रचंड ट्रोल झाला. त्यावर स्पष्टीकरण देताना त्याने म्हटले, ‘आम्ही जेव्हा शो करतो तेव्हा आम्हाला समोर पाहिल्यानंतर चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचतो. आम्ही सभ्य लोकं आहोत. आमचे चाहते आमच्यावर प्रेम करतात. असं असताना या गोष्टीची चर्चा का करायची? गर्दीत बरेच लोकं आहेत आणि आमचे बॉडीगार्डसुद्धा आहेत. पण चाहत्यांना भेटण्याची संधी मिळतेय असं वाटतं. त्यामुळे मग कुणी हात पुढे करतात, तर कुणी हाताचं चुंबन घेतात. हा सगळा उत्साह आहे. लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी आम्हाला अशा गोष्टी कराव्या लागतात. त्यामुळे याकडे एवढं लक्ष देऊ नका’.
नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
उदित नारायणच्या किसिंगचा किस्सा हा काही पहिला नव्हे. याआधीच्या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर अक्षरशः संतापाची लाट उसळली होती. याची तीव्रता कमी होण्याआधीच गायकाचा पुन्हा तसाच दुसरा व्हिडीओ समोर आला. जो पाहून नेटकऱ्यांचा राग विकोपाला गेलाय. या व्हायरल व्हिडिओवर एका नेटकऱ्याने लिहिलं, ‘याला जरा आवरा.. कसला ठरकी आहे’, तर आणखी एकाने लिहिले, ‘हा तर इमरान हाश्मीचा गॉडफादर निघाला’, तसेच अन्य एकाने म्हटले, ‘याला जराही कशी लाज नाही..’. आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, ‘याच्यासारख्यांमुळे बाकीचे उगाच बदनाम होतील’.
हेही पहा –
Chhaava Movie New Song : आया रे तुफान, छावाच्या नवीन गाण्यात दिसली मराठी कलाकारांची झलक