घरमनोरंजनसलमानला आलेल्या धमकीच्या ईमेलचं यूकेशी कनेक्शन; मुंबई पोलिसांचा खुलासा

सलमानला आलेल्या धमकीच्या ईमेलचं यूकेशी कनेक्शन; मुंबई पोलिसांचा खुलासा

Subscribe

नुकत्याच काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता सलमान खानला धमकीचा ईमेल आला होता. तेव्हापासून सगळीकडे खळबळ उडाली. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी सध्या तपास करत आहेत. दरम्यान, आता पोलिसांच्या तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, ज्या ई-मेल आयडीवरून सलमानला धमकीचा मेल पाठवला गेला होता, हा यूकेमधील एका मोबाईल नंबरशी जोडलेले असल्याचं कळलं आहे. पोलिस सध्या हा नंबर ज्या व्यक्तीच्या नावावर नोंदवला आहे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

गेल्याच आठवड्यात मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या कार्यालयात धमकीचे ईमेल पाठवल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी ब्रार आणि रोहित गर्ग यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. वांद्रे पोलिसांनी आयपीसीच्या कलम 506 (2) 120 (B)आणि 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

तसेच सलमानच्या घराबाहेर अधिक सुरक्षा वाढवण्यात आली आहे. यात दोन सहाय्यक निरीक्षक (API) दर्जाचे अधिकारी आणि 8-10 कॉन्स्टेबल सलमानच्या सुरक्षेसाठी 24 तास तैनात असतील. तसेच सलमानच्या चाहत्यांना त्याच्या वांद्रे येथील घराबाहेर थांबण्यास बंदी घालण्यात आली आहे. यापूर्वी सलमानला पोलिसांकडून Y+ सुरक्षा देण्यात आली होती. आता पोलिसांकडून सलमानच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली आहे.

लॉरेन्स बिश्नोईने दिली होती सलमान खानला जीवे मारण्याची धमकी

दरम्यान, गेल्या वर्षी देखील गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. बिश्नोई म्हणाला होता की, सलमानला मारणे हे त्यांचे एकमेव उद्दिष्ट आहे आणि लहानपणापासूनच त्याच्या मनात सलमानबद्दल राग आहे. सलमानने आपल्या बिकानेर येथील मंदिरात समाजातील लोकांची माफी मागावी अन्यथा ठोस उत्तर दिले जाईल, असेही बिष्णोई म्हणाला होता.

- Advertisement -

 


हेही वाचा :

आशा भोसले यांचा आज ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरव, गेटवे ऑफ इंडियाला भव्य सोहळा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -