घरताज्या घडामोडीRussia Ukraine War : बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या 'या' युक्रेनियन अभिनेत्रीने स्वतःच्या पाठीवर...

Russia Ukraine War : बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या ‘या’ युक्रेनियन अभिनेत्रीने स्वतःच्या पाठीवर काढलं पंतप्रधानांचं चित्र

Subscribe

रशिया- युक्रेनच्या युद्धा दरम्यान नतालियाचा फोटो पुन्हा वायरल

Russia Ukraine War : बॉलिवूड आणि वेबसिरीजमध्ये काम करणारी युक्रेनियन अभिनेत्री नतालिया कोझीनोवा (Nataliya kozhenova) ही सध्या सोशल मिडियावर वेगळ्याचं चर्चेत आहे. सध्या चालू असणार्या रशिया आणि युक्रेनमधील युद्धाने सगळ्या जगाचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. नेमक्या अशा वेळीचं नतालियाने स्वतःच्या पाठीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचं चित्र काढलं आहे.

तिने तिचे हे फोटो सोशल मिडियावर शेयर केले आहेत, त्यामुळे ती चर्चेचा विषय बनली आहे. खरंतर तिने काढलेलं हे चित्र २०१५ मधील असून त्या वेळी भारत आणि अमेरिकेचे संबंध सुधारत असल्याचा आनंद तिने व्यक्त केला होता. पण सध्या चालू असलेल्या रशिया-युक्रेनच्या युद्धामुळे तिचं हे चित्र पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

- Advertisement -

नतालियाने २०१० साली ‘अतिथी तुम कब जाओगे’ या हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात ती पाहूणी कलाकार होती. त्याबरोबरंच तिने अंजुना बीच, लव्ह वर्सेस गँगस्टर, तेरे जिस्म से जान तक या चित्रपटांमध्ये मुख्य भुमिका साकारली होते.

- Advertisement -

याशिवाय तिने ‘सुपर मॉडेल’ आणि ‘बोले इंडिया जय भीम’ या हिंदी चित्रपटांमध्ये देखील तिने काम केलं आहे. तिने गंदी बात या वेब सिरिजमध्ये काम केलं आहे. या वेबसिरिजमझधील बोल्ड सीनमुळे नतालिया चर्चेत आली होती.


अधिक वाचा : अजय देवगणला अवॉर्ड फंक्शनला जाणे का आवडत नाही? काजोलने 23 वर्षांनंतर केला खुलासा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -