घरमनोरंजनउमेश कामत आणि मुक्ता बर्वेच ‘61 मिनिट्स’ थरारनाट्य प्रेक्षकांच्या भेटीला

उमेश कामत आणि मुक्ता बर्वेच ‘61 मिनिट्स’ थरारनाट्य प्रेक्षकांच्या भेटीला

Subscribe

मुक्ता बर्वे आणि उमेश कामत यांची ‘अजूनही बरसात आहे’ ही नवी मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. ऑडिओ कन्टेन्ट निर्माण करणाऱ्या ‘स्टोरीटेल मराठी’ या जगविख्यात प्लॅटफॉर्मने खास नव्याने तयार केलेल्या ‘61 मिनिट्स’ या ओरिजिनल ऑडिओ ड्रामामध्ये मुक्ता आणि उमेश एका वेगळ्याच रूपात आपल्यासमोर येणार आहेत आणि ओंकार गोवर्धन, समीर पाटील आणि रोहित कोकाटे हे कलाकार त्यांच्याबरोबरीने असणार आहेत.

काय आहे थ्रिलर?
मयूर, निशा, स्वानंद आणि आवारे सर या चौघांनी या ‘तर?’ चा विचार कधी केलाच नव्हता. म्हणूनच ते अश्या अंधार असलेल्या खोलीत प्रत्यक्षात सापडल्यानंतर घाबरले आहेत. त्यात त्यांना तिथे कोणी किडनॅप करूनआणलंय? त्यामागचं कारण काय? त्या किडनॅपरला हवंय काय? हेही कोणी सांगत नाहीये. अंधारा असलेल्या खोलीत अखेर स्पीकरवरून एक घोषणा दिली जाते, ज्यात त्यांना एक कोडं घातलं जातं, जे त्यांच्याच भुतकाळाशी निगडित आहे. ते सोडवणं हाच त्या चौघांपुढे एकमेव पर्याय उरतो आणि सुरू होतं एक थरारनाट्य. ते कोडं त्यांना सुटतं का? 61 मिनिटांचं नक्की काय महत्त्व आहे? त्या चौघांना तिथे का आणलं गेलंय? तो किडनॅपर कोण आहे? त्याला नक्की काय हवंय? या सर्व प्रश्नांची उत्तरं म्हणजेच ‘61 मिनिट्स’ हा ऑडिओ ड्रामा.

- Advertisement -

मुक्ता बर्वे हिने यापूर्वी रंगवलेल्या अनेक भूमिका ह्या लोकप्रिय ठरल्या आहेत. उमेश कामत हा तर लाखो तरुणींचा लाडका अभिनेता आहे. ओंकार गोवर्धन याने ‘सावित्री-ज्योती’या मालिकेत रंगवलेली महात्मा ज्योतिबा फुले यांची भूमिका प्रेक्षकांच्या खास आवडीची ठरली. समीर पाटील आपल्याला ‘पोश्टर बॉयज्’, ‘पोश्टर गर्ल’,‘विकून टाक’ अश्या विनोदी चित्रपटांचे लेखक-दिग्दर्शक म्हणून प्रसिध्य आहेत.

इप्सिता’, ‘धारणा’, ‘अफेअर’ अश्या लोकप्रिय ठरलेल्या ऑडिओ सीरीजचा लेखक तुषार गुंजाळ याच्याच लेखणीतून ‘61 मिनिट्स’ हे थरारनाट्य उतरले आहे. सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर या सुप्रसिद्ध दिग्दर्शक जोडगोळीच्या हाताखाली सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेल्या तुषारनेच या ऑडिओ ड्रामाचे दिग्दर्शनसुद्धा केलेले आहे. ‘61 मिनिट्स’ या ऑडिओ ड्रामाच्या शेवटी जो संदेशवजा अनुभव मिळतो तो सर्वांपर्यंत पोहचणं अत्यंत गरजेचं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -