घरमनोरंजनउमेश कामत आणि प्रिया बापटला कोरोनाची लागण

उमेश कामत आणि प्रिया बापटला कोरोनाची लागण

Subscribe

अभिनेत्री प्रिया बापट आणि पती उमेश कामत यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांनी स्वत: क्वारंटाइनही केले आहे.

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना बॉलिवूडही याच्या विळख्यात अडकले होते. बॉलिवूड पाठोपाठ आता मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणजेच उमेश कामत आणि प्रिया बापट यांनाही कोरोना संसर्गाची लागण झाल्याचे समजले आहे. ही माहिती स्वत: उमेशने त्याच्या इन्स्टा स्टोरीवर दिली आहे. या स्टोरी मध्ये उमेशने असे लिहिले आहे की, दुर्दोवाने प्रिया आणि माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. आम्ही दोघोही होम क्वारंटाइन आहोत. आम्ही दिलेल्या सूचनेनुसार उपचार आणि काळजी घेत आहोत. कृपया मागील आठवड्याभरात आमच्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वत: जाऊन कोरोनाची टेस्ट घ्यावी किंवा स्वत:ला आइसोलोट करुन घ्या. अशी पोस्ट प्रिया आणि उमेशने शेअर केली आहे.

- Advertisement -

उमेश कामत आणि प्रिया बापट यांनी नुकतीच ‘आणि काय हवे’ या वेबसीरिजच्या तिसऱ्या सीझनच्या शुटिंगला सुरुवात केली होती. ही माहिती ही त्यांनी सोशल मीडियाद्वारे दिली होती. मात्र आता दोघांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे ही शुटिंग थांबवण्यात आले आहे.


हे वाचा- तेलुगू सुपरस्टार नागार्जुन यांनी घेतली कोरोना लस

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -