सतीश कौशिक यांच्या मृत्यूशी अंडरवर्ल्ड डॉनचे कनेक्शन? विकास मालूच्या पूर्व पत्नीचा दावा

अभिनेते सतीश कौशिक यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. 9 मार्च रोजी सतीशने अचानक जगाचा निरोप घेतला. हा काळ त्याच्या कुटुंबासाठी आणि मित्रासाठी खूप कठीण आहे. सतीश कौशिक यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे म्हटलं जात असलं तरी आता याबाबत नवीन खुलासे समोर येत आहेत. सतीश यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचं म्हटलं जात असून याप्रकरणात सतीश त्यांचा जुना मित्र विकास मालू चर्चेत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास मालूचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत कनेक्शन आहे. याप्रकरणात विकास मालूच्या आधीच्या पत्नीने देखील अनेक खुलासे केले आहेत.

खरं तर, अभिनेते सतीश कौशिक यांचा मृत्यू विकास मालूच्या फार्महाऊसमध्ये झालेल्या होळी पार्टीच्या एका दिवसानंतर झाला होता. ज्यानंतर दिल्ली पोलिस यांनी फार्म हाऊस पोहोचून सर्वांची चौकशी केली. विकास मालूच्या पूर्व पत्नीचा दावा आहे की, 15 कोटींवरुन गेल्या वर्षी एका पार्टीमध्ये सतीश आणि विकास यांच्यात बाचाबाची झाली होती.

सतीश कौशिक यांच्या मृत्यूशी अंडरवर्ल्ड डॉन कनेक्शन?

विकास मालूच्या आधीच्या पत्नीने अंडरवर्ल्ड डॉनसोबत आपल्या पतीचे व्यावसायिक संबंध असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे यामागे अंडरवर्ल्ड डॉन कनेक्शन असल्याचे तिने सांगितले आहे. तसेच विकासच्या पूर्व पत्नीने सांगितले होते की. दुबईतील पार्टीमध्ये त्यावेळी दाऊदचा मुलगा अनस देखील उपस्थित होता. मात्र, पोलिसांना तपासादरम्यान समजले की, अनस हा दाऊदचा मुलगा नसून तो एक व्यावसायिक आहे. तसेच सतीश यांचे कुटुंबिय 15 कोटींचा व्यवहार आणि वादाला नकार देत आहेत.

विकास मालूने दिलं स्पष्टीकरण

सतीश कौशिक यांच्या मृत्यूनंतर विकास मालूवर त्यांच्या पूर्व पत्नीने अनेक आरोप केले. दरम्यान, आता या सर्व आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. विकासने त्याच्या इंस्टाग्रामवर होळीचा व्हिडीओ पोस्ट करत त्याच्यावर लावण्यात आलेले आरोप निराधार असल्याचे म्हटलं आहे. माझे आणि सतीशचे 30 वर्षांपासून कौटुंबिक संबंध असून काहीजण वैयक्तिक सूड दाखवण्यासाठी माझे नाव खराब करत आहेत.


हेही वाचा :

निर्मिती सावंत यांची ‘या’ मालिकेत झाली एन्ट्री