Smriti Irani: कपिल शर्मा शोच्या सेटवरुन रागात निघून गेल्या स्मृती इराणी, कारण वाचून बसेल धक्का

union minister actress Smriti Irani Return from set of Kapil Sharma show
Smriti Irani: कपिल शर्मा शोच्या सेटवरुन रागात निघून गेल्या स्मृर्ती इराणी, कारण वाचून बसेल धक्का

केंद्रीय मंत्री स्मृती इरानी सध्या त्यांच्या वेट लॉस ट्रान्सफॉर्मेशनमुळे चांगल्याच चर्चेत आहेत. स्मृती इराणीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. त्याचप्रमाणे स्मृती इराणींचे आणखी एका गोष्टीसाठी कौतुक केले जात आहे. ते म्हणजे त्यांचे पुस्तक लाल सलाम. त्यांच्या पुस्तकाचे प्रमोशन करण्यासाठी स्मृती इराणी थेट कपिल शर्माच्या शोमध्यो पोहचल्या.मात्र कपिल शर्मा शोला निघालेल्या स्मृर्ती इराणी शो च्या गेटवरुनच मागे फिरल्या.

स्मृती इराणी यांना लाल सलाम या पुस्तकासाठी कपिल शर्मा शोसाठी निघाल्या होत्या.स्मृती इराणी स्टुडिओजवळ पोहचल्या. मात्र स्टुडिओच्या गेटवर जाताच त्यांची गाडी स्टुडिओच्या गार्डने थांबवली आणि स्मृर्ती इराणींना आत जाण्यापासून थांबवले. त्यानंतर गार्ड आणि स्मृर्ती इराणींच्या ड्रायव्हरमध्ये भांडण झाले आणि त्यानंतर स्मृती इराणींनी यावर नाराजी व्यक्त करुन शुटींगला न जाता गेटवरुनच घरी परतल्या.

कपिल शर्मा शोमध्ये अनेक सेलिब्रेटी येत असतात. कपिल शर्माच्या अपकमिंग एपिसोडमध्ये स्मृती इराणी त्यांच्या लाल सलाम पुस्तकाचे प्रमोशन करणार होत्या. मात्र या प्रसंगानंतर त्यांनी कार्यक्रम रद्द केला. टेलीचक्करने दिलेल्या माहितीनुसार, कपिल शर्मा आणि स्मृती इराणी यांना याबाबत काहीही माहिती नव्हते. सगळं काही ड्रायव्हर आणि गार्ड यांच्याच झाले आणि त्यामुळे कार्यक्रमाचे शुटींग रद्द करावे लागले.

दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, कपिल शर्माच्या स्टुडिओच्या सेटवर असलेल्या गार्डने स्मृती इराणी यांना ओळखले नाही. गार्डने त्यांना शुटींगसाठी बोलावले आहे का असे विचारल्यानंतर त्यांनी मला असे कोणतेही आदेश देण्यात आलेले नसल्याचे सांगितले. त्यावर गार्डने त्यांना आत जाण्यास नकार दिला. त्यावेळी एक फुड डिलिव्हरी बॉय देखील गेटवर आला त्याला आत जाण्यासाठी गार्डने होकार दिला. हे पाहून स्मृती इराणींचा पारा चढला आणि त्या रागात येऊन तिथून निघाल्या.


हेही वाचा – Atarangi re Trailer Poster: ट्रेलर आधीच अक्षय कुमारने शेअर केलं अतरंगीचं मजेदार पोस्टर