नव्वदच्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक म्हणजे ट्विंकल खन्ना. वडील सुपरस्टार राजेश खन्ना आणि आई डिंपल कपाडिया यांच्याकडून ट्विंकलला पाळण्यातच अभिनयाचा वारसा मिळाला होता. ट्विंकलने ‘बरसात’ या सिनेमाद्वारे 1995 मध्ये बॉलीवूडमध्ये एट्री केली होती. खरं तर, ट्विंकलचे स्वप्न काही वेगळेच होते. तिला चार्टड अकाऊंटट व्हायचे होते. पण, आईवडीलांच्या पावलावर पाऊल ठेवत तिने सिनेविश्वात एट्री घेतली आणि अनेक हिट सिनेमे केले. बॉलीवूड स्टार अक्षय कुमारशी लग्न केल्यानंतर मात्र तीने बॉलीवूड इंडस्ट्रीला रामराम ठोकला. पण, आजही ट्विंकलकडे एक अभिनेत्री, इंटिरीअर डिझायनर, लेखिका आणि उत्कृष्ट बायको, आई म्हणूनही पाहीले जाते.
ट्विंकलचा जन्म 29 डिसेंबर 1973 रोजी झाला. न्यू एरा हायस्कूलमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर ट्विंकलला चार्टर्ड अकाउंटट व्हायचे होते. त्यासाठी तिने परीक्षा देखील दिली होती. पण, घरात अभिनयाचे वातावरण असल्याने ट्विंकलने बॉलीवूड इंडस्ट्रीत प्रवेश केला. बरसात या सिनेमामध्ये ट्विंकलने बॉबी देओलसोबत काम केले आणि तिचा पहिलाच सिनेमा हिट ठरला. यानंतर ट्विंकलचे अनेक चित्रपट आले. जान, दिल तेरा दिवाना, बादशाह, जब प्यार किसी से होता है, इतिहास, जोरू का गुलाम, जोडी नंबर 1, जुल्मी, ये है मुंबई मेरी जान, मेला असे अनेक चित्रपट तिने केले. ट्विंकलने तिच्या कारर्किदीत एकूण 16 चित्रपट केले.
अक्षयशी लग्नगाठ
ट्विंकल आणि अक्षयशी ओळख मुंबईत फ्लिमफेअर मॅगझिनच्या शूटदरम्यान झाली. तर ‘इंटरनॅशनल खिलाडी’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. 2001मध्ये अक्षय आणि ट्विंकलने लग्नगाठ बांधली. त्यांना दोन मुले आहेत. मुलीचे नाव ‘नितारा’ आणि मुलाचे नाव ‘आरव’ असे आहे.
ट्विंकलने अभिनय क्षेत्र सोडल्यानंतर निर्मिती क्षेत्रात आपले नाव उंचावले. 2010 मध्ये तीस मार खान, पटियाला हाउस, 2012मध्ये खिलाडी 786, 2013 मध्ये 72 माइल्स, 2018मध्ये पॅडमॅन सारख्या हिट चित्रपटाची निर्मिती केली. 2002 मध्ये ट्विंकलने तिचे इंटेरिअर डिझाइन स्टोअर द व्हाइट विंडो सुरू केले. तिने आजपर्यत राणी मुखर्जी, रीमा सेन, तब्बू, करीना कपूर यांच्या घराचे इंटेरीअर केले आहे. इंटिरीअर डिझायनर, अभिनेत्री, निर्मातीसह ट्विंकल उत्तम लेखका देखील आहे. 2015 मध्ये Mrs Funnybones, 2016मध्ये The Legend Of Lakshmi Prasad आणि 2023 मध्ये Welcome To Paradise अशी पुस्तके ट्विंकलने लिहिली होते. याशिवाय आणखी एक गोष्ट सांगायची झाल्यास ट्विंकलने वयाच्या 50 व्या वर्षी लंडन यूनिव्हर्सिटी गोल्डस्मिस्थमध्ये फिक्शन राइटिंग मास्टर्स डिग्री घेतली आहे.
हेही पाहा –