Unpaused : Naya Safar: ‘अनपॉज़्ड: नया सफर’चे मोशन पोस्टर लाँच

सुंदर पार्श्वसंगीत असलेले, मोशन पोस्टर तीन तिगडा, द कपल, गोंद के लड्डू, वॉर रूम आणि वैकुंठ या त्यातील पाच ही चित्रपटांची झलक देते. चित्रपटाचा ट्रेलर १५ जानेवारी २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Amazon Prime Video Unpaused Naya Safar new song release
Amazon Prime Video Unpaused Naya Safar new song release

‘अनपॉज्ड: नया सफर’ या बहुप्रतिक्षित हिंदी एंथोलॉजीचा ट्रेलर प्रदर्शित होण्याआधी, अमेझॉन प्राईम व्हिडीओने चित्रपटाच्या मोशन पोस्टर लाँच केले आहे. यात या एंथोलॉजीच्या पाचही चित्रपटांची स्टार-कास्ट आहे. सुंदर पार्श्वसंगीत असलेले, मोशन पोस्टर तीन तिगडा, द कपल, गोंद के लड्डू, वॉर रूम आणि वैकुंठ या त्यातील पाच ही चित्रपटांची झलक देते. चित्रपटाचा ट्रेलर १५ जानेवारी २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. लॉकडाऊनचा अनुभव प्राइम व्हिडीओने अनपोज्ड या सीरिजच्या माध्यमातून मांडलाय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shreya Dhanwanthary (@shreyadhan13)

‘अनपॉज्ड: नया सफर’ अशा पाच अनोख्या कथा आपल्याला दाखवतो ज्या, आशा, सकारात्मकता आणि नवीन सुरुवात याबाबत आहेत. प्रेम, तळमळ, भीती आणि मैत्री यासारख्या कच्च्या मानवी भाव-भावनांचे शब्दचित्र – शिखा माकन (गोंद के लड्डू), रुचिर अरुण (तीन तिगडा), नुपूर अस्थाना (द कपल), अयप्पा केएम (वॉर रूम) आणि नागराज मंजुळे (वैकुंठ) यांसारख्या चित्रपट दिग्दर्शकांनी संवेदनशीलतेने जिवंत केले आहे. भारत आणि 240 देश आणि प्रदेशांमधील सदस्य ‘अनपॉज्ड: नया सफर’ 21 जानेवारी 2022 पासून अमेझॉन प्राईम व्हिडीओवर पाहू शकतील.

‘लॉकडाउन स्पेशल’ अनपोज्ड सीरिज

१) तीन तिगाडा: साकिब सलीम, आशिष वर्मा आणि सॅम मोहन प्रमुख भूमिकेत आहेत.

२) द कपल: श्रेया धन्वंतरी, प्रियांशू पेन्युली

३) गोंद के लड्डू: दर्शन राजेंद्रन, अक्षवीर सिंग सरन आणि नीना कुलकर्णी

४) वॉर रूम: गीतांजलि कुलकर्णी, रसिका अगाशे, पूर्णानंद वांदेकर और शरवरी देशपांडे

५) वैकुंठ : अर्जुन करचेंद, हनुमंत भंडारी


हेही वाचा – लॉकडाऊनवर भाष्य करणारी ‘अनपॉझ्ड – नया सफर’ वेबसीरिज, या दिवशी होणार रिलीज