घरमनोरंजनUrfi Javed आता काय करणार?इंस्टा अकाऊंट सस्पेंड

Urfi Javed आता काय करणार?इंस्टा अकाऊंट सस्पेंड

Subscribe

उर्फी जावेद नेहमीच तिच्या वेगळ्या लूकमुळे चर्चेत असते. तिची अतरंगी फॅशन तर कधी बिनधास्त वक्तव्यामुळे उर्फीची चर्चा सर्वत्र होत असते..पण आता मात्र उर्फीला मोठा धक्का बसला आहे.उर्फीच्या सोशल मीडिया बाबत ही बातमी समोर आली आहे.

 

उर्फी जावेद नेहमीच तिच्या वेगळ्या लूकमुळे चर्चेत असते. तिची अतरंगी फॅशन तर कधी बिनधास्त वक्तव्यामुळे उर्फीची चर्चा सर्वत्र होत असते.टीव्ही,मनोरंजन क्षेत्र यामधील प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून सध्या उर्फी जावेद ओळखली जात आहे.सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असतात.पण आता मात्र उर्फीला मोठा धक्का बसला आहे.उर्फीच्या सोशल मीडिया बाबत ही बातमी समोर आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा:किती शिकली आहे Urfi Javed?

इंस्टाग्राम द्वारे उर्फी तिच्या चाहत्यांना आयुष्यातील प्रत्येक अपडेट देत असते. उर्फीला चार मिलियन पेक्षाही जास्त फॉलोवर्स इंस्टाग्रामला आहेत. लाखोंमध्ये तिची स्टोरी पाहिली जाते. त्याचबरोबर त्यातील काही चाहते तिला लाईक देतात तर काही वेगवेगळ्या प्रकारच्या टीका सुद्धा करतात. पण उर्फीने अलीकडे एक इंस्टास्टोरी शेअर केली आणि तिच्या चाहत्यांना धक्का दिला आहे. तिने तिच्या चाहत्यांना सांगितलं आहे की तिचं इंस्टाग्राम अकाउंट इंस्टाग्रामने सस्पेंड केले आहे. हे कळताच तिचे चाहते दुखावले आहेत.

- Advertisement -

urfi javed

इंस्टाग्राम ने ती इंस्टाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत नसल्यामुळे तिचे खाते सस्पेंड केल्याचं सांगितले आहे. असा स्क्रीन शॉट तिने शेअर केला आहे.

पण काही वेळातच तिने दुसरे स्टोरी शेअर केली आहे. ज्यामध्ये उर्फीचं अकाउंट पुन्हा सुरू झाला आहे.

urfi javed photo

अनावधानाने तिचे अकाउंट सस्पेंड झालं त्याबद्दल क्षमा सुद्धा इंस्टाग्राम ने मागितली आहे असा स्क्रीन शॉट शेअर करत ‘म्हणजे तुम्हीच ठरवा’ असा कॅप्शन उर्फी जावेदने दिला आहे. त्यामुळे उर्फी च्या फोटोंना तिरस्कार करणाऱ्या लोकांसाठी काही क्षणासाठी सुखद बातमी होती. पण तिच्या चाहत्यांना मात्र तिचे अकाउंट पुन्हा सुरू झाल्याने आनंद झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -