मिस युनिव्हर्सचा किताब जिंकताच हरनाज सिंधूचे बदलले रंग… उपासना सिंहने केली हरनाज विरोधात तक्रार दाखल

उपासना सिंहच्या मते, ती एका चित्रपटाची निर्मिती करत होती, ज्यामध्ये काम करण्याला हरनाजने अनुमती दिली होती. परंतु त्यानंतर ती चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पुढे आली नाही आणि आता ती सुद्धा उचलत नाही.

२०२२ मध्ये मिस यूनिवर्सचा किताब जिंकून हरनाज सिंधूने आपल्या भारताचं मान अभिमानाने उंचावली. यादरम्यानच, आता हरनाज सिंधूविरोधात चंदीगढ कोर्टात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अभिनेत्री उपासना सिंहने मिस यूनिवर्स हरनाज सिंधू विरोधात चंदीगढ कोर्टात तक्रार दाखल केली आहे.

याचं कारण म्हणजे, अभिनेत्री उपासना सिंह पंजाबी चित्रपटांमध्ये देखील काम करते आणि पंजाबी चित्रपटांची निर्मिती देखील करते. उपासना सिंहने वकील करण सचदेवा आणि इरवनीत कौरच्या माध्यमातून कोर्टामध्ये मिस यूनिवर्स विरोधात कराराचे उल्लंघन आणि नुकसान केल्याचा दावा करत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
हरनाज विरोधात तक्रार दाखल झाल्याची बाचमी कळताच सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे.

चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी हरनाज सिंधूची गैरहजेरी
उपासना सिंहच्या मते, ती एका चित्रपटाची निर्मिती करत होती, ज्यामध्ये काम करण्याला हरनाजने अनुमती दिली होती. परंतु त्यानंतर ती चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पुढे आली नाही आणि आता ती सुद्धा उचलत नाही. तिच्याकडे हरनाज विरोधातील पुरावे सुद्धा आहेत. आता कोर्टाकडून हरनाजला समन्स पाठवण्यात आली येईल.

हरनाज सिंधूने केलं कराराचं उल्लंघन

२०२० मध्ये हरनाने फेमिना मिस इंडिया पंजाबचा किताब जिंकला होता. त्यादरम्यान तिने संतोष एंटरटेनमेंट स्टूडियो LLP सोबत एक आर्टिस्ट अॅग्रीमेंट साइन केलं. हा स्टूडियो उपासना सिंह चालवत होती. यामध्ये हरनाज मुख्य भूमिकेत होती. या करारानुसार हरनाजला चित्रपटाच्या प्रमोशनसाठी उपस्थित राहायचं होतं.

उपासना सिंहच्या मते, हरनाज सिंधूने आता २०२२ मध्ये मिस यूनिवर्सचा किताब जिंकला आहे. त्यानंतर तिला पंजाबी चित्रपटामध्ये काम करायचं नाही. तिला आता पंजाबी इंडस्ट्री लहान वाटू लागली आहे. परंतु हरनाजने हे विसरून चालणार नाही की, ती कुठून आली आहे. पंजाबी चित्रपटामध्ये काम करण्याचा तिला अभिमान असायला हवा.


हेही वाचा :कोणताही मंत्री असो त्यांच्या पत्नीला… अमृता फडणवीसांनी दिलं गमतीशीर उत्तर