Friday, March 28, 2025
27 C
Mumbai
HomeमनोरंजनUpcoming Marathi Movie : कणकाधीशची घोषणा, सद्गुरू भालचंद्र महाराजांची गाथा मोठ्या पडद्यावर येणार

Upcoming Marathi Movie : कणकाधीशची घोषणा, सद्गुरू भालचंद्र महाराजांची गाथा मोठ्या पडद्यावर येणार

Subscribe

गेल्या अनेक दिवसांपासून मराठी सिनेसृष्टीत देखील वेगवेगळ्या विषयांवर आधारलेले चित्रपट केले जात आहेत. ज्यामध्ये गुन्हेगारी, हास्यविनोद, प्रेम आणि अध्यात्मिक गोष्टींचा समावेश आहे. येत्या काळात असाच एक अध्यात्मिक विषयावर भाष्य करणारा चित्रपट आपल्या भेटीस येतोय. असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या सद्गुरू भालचंद्र महाराजांचा जीवनप्रवास या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर येतोय. ज्याचं नाव ‘कणकाधीश’ असे आहे. (Upcoming Marathi Movie Kanakadhish announced with poster launched)

गरजवंतांचे तारणहार होत दैवी अनुभूती देण्याचं काम अनेक महान अध्यात्मिक गुरूंनी आजवर केलं आहे. ज्यांनी आपल्या जीवनात आयुष्यभर तपसाधनेत मग्न राहून तपचर्या केली आणि भक्तांची दुःखे निवारण केले असे सद्गुरू भालचंद्र महाराज ही देवत्व प्राप्त केलेली महान अनुभूती. त्यांच्या कृपेची प्रचिती आजही असंख्य भाविकांना येते. योगियांचे योगी, असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान परमहंस भालचंद्र महाराज यांचा जीवनप्रवास आता मराठी रुपेरी पडद्यावर येण्यासाठी सज्ज होतो आहे.

कणकवलीमध्ये नुकत्याच भालचंद्र महाराज यांच्या 121 व्या जयंतीनिमित्त निर्माते हरेश शशिकांत आईर आणि सौ. अमृता हरेश आईर यांनी ‘कणकाधीश’ या मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. मुख्य म्हणजे, या घोषणेसोबत त्यांनी चित्रपटाच्या पोस्टरचेदेखील अनावरण केले आहे. महाराजांनी केलेल्या अलौकिक कार्याचा पट ‘कणकाधीश’ आता प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज होतोय. या चित्रपटातून महाराजांची गाथा मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. योग तपस्वी, कणकाधिपती परमहंस भालचंद्र महाराजांची महती, अध्यात्मिक सामर्थ्याची प्रचिती, महाराजांच्या जीवन चरित्रातील अनुभवांचे भावस्पर्शी सादरीकरण प्रत्येकाला महाराजांच्या सान्निध्याची नक्कीच अनुभूती देईल, असा विश्वास मृद्रा व्हिज्युअल प्रोडक्शन्सचे संस्थापक आणि ‘कणकाधीश’ चित्रपटाचे निर्माते हरेश शशिकांत आईर यांनी व्यक्त केला आहे.

मृद्रा व्हिज्युअल प्रोडक्शन्सची प्रस्तुती असलेल्या ‘कणकाधीश’ चित्रपटाचे लेखन प्रल्हाद कुडतरकर यांचे तर दिग्दर्शन विविध कोरगांवकर करणार आहेत. छायाचित्रण कौशल गोस्वामी, संगीत दिग्दर्शन साई- पीयुष यांचे आहे. कलादिग्दर्शन महेश कुडाळकर यांचे आहे. सहनिर्माते मिलिंद शिंगटे आहेत. या चित्रपटासाठी छत्रपती स्टुडिओ यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

हेही पहा –

Tamannaah Bhatia and Vijay Varma Breakup : तमन्ना- विजयचं ब्रेक अप? नेमकं झालं तरी काय?