घरमनोरंजन‘वेडिंगचा शिनेमा’ चित्रपटाच दुसर गाण प्रदर्शीत

‘वेडिंगचा शिनेमा’ चित्रपटाच दुसर गाण प्रदर्शीत

Subscribe

'वेडिंगचा शिनेम’मधील दुसरे गाणे “उगीचच काय भांडायचंय ? गोल गोल, पुन्हा पुन्हा, तेच तेच, काय बोलायचंय ?...” प्रदर्शित झालं आहे.

संगीत दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी ‘वेडिंगचा शिनेमा’या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पहिलं पाऊल टाकत आहेत. सध्या मराठी चित्रपटसृष्टीत त्यांच्या या आगमी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाचे दुसरे गाणे “उगीचच काय भांडायचंय? गोल गोल फिरून पुन्हा, तिथेच का घुटमळायच, आज प्रदर्शित झाले. मुख्य म्हणजे हे गाणं स्वतः हा चित्रपटाचे दिग्दर्शक सलील कुलकर्णी यांनी लिहिले असून त्यांनीच ते गायले सुद्धा आहे.

गाण्याचा आशय

आपल्यावर भरपूर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर आपण नेहमीच आणि उगीचच भांडत असतो, त्या भांडण्याला काही कारण पण नसते, पण उगीचच आपण सगळ्यांन बरोबर भांडत असतो. हेच या गाण्याच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे.‘आयुष्यावर बोलू काही’मधील सलील कुलकर्णी यांचा सहकारी आणि कवी संदीप खरे यांनी या चित्रपटाची गाणी लिहिली आहेत. “उगीचच काय भांडायचंय? गोल गोल, पुन्हा पुन्हा, तेच तेच, काय बोलायचंय? हे गाणेही त्यातीलच एक आहे.

- Advertisement -

काय आहे कथानक ?

पारंपारिक रीतीरिवाज ते आधुनिक फॅड आणि पद्धती यांचा मिलाप हल्ली भारतीय विवाह सोहळ्यांमध्ये पाहायला मिळतो. लग्नाचा सोहळा संपूर्ण कुटुंबासाठी उत्सवी क्षणांचा मेळावा असतो. बहुचर्चित ‘वेडिंगचा शिनेमा’मध्ये हे सगळे पैलू भरपूर मनोरंजनाच्या मसाल्यासह प्रेक्षकांसमोर येणार आहेत. या चित्रपटाचा एक टीझर काहि दिवस आधीच प्रदर्शित झाला होता. दरम्यान, एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट प्रस्तुत आणि गेरुआ प्रॉडक्शन्स निर्मित हा चित्रपट १२ एप्रिल रोजी प्रक्षकांच्या भेटीला येणार आहे.

चित्रपटाचे कलाकार

वेडिंगचा शिनेमा’मध्ये मुक्ता बर्वे, भाऊ कदम, शिवाजी साटम, अलका कुबल, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, प्रवीण तरडे, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हणमगर, योगिनी पोफळे या आघाडीच्या कलाकारांच्या भूमिका आहेत, शिवराज वायचळ आणि ऋचा इनामदार ही नवोदित जोडी या चित्रपटातून पदार्पण करत आहे. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, मुंबई पुणे मुंबई सारखे दर्जदार चित्रपटांची मलिका देणाऱ्या एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटच्या या आगामी चित्रपटाकडून लोकांना मोठ्या अपेक्षा असून त्या अपेक्षा पूर्ण करण्यात वेडिंगचा शिनेमा कितपत यशस्वी ठरतोय ते येणारा काळच ठरवेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -