Sunday, March 16, 2025
27 C
Mumbai
HomeमनोरंजनUpcoming Movie : ऑनलाइन स्कॅम्सपासून सतर्क करायला येतोय फ्रॉम चायना विथ लव्ह, ट्रेलर रिलीज

Upcoming Movie : ऑनलाइन स्कॅम्सपासून सतर्क करायला येतोय फ्रॉम चायना विथ लव्ह, ट्रेलर रिलीज

Subscribe

सध्या ऑनलाइन घोटाळ्यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. घोटाळेबाज फसवणुकीसाठी नवनवीन युक्त्या वापरत आहेत. ऑनलाइन खरेदीकडे लोकांचा वाढता कल बघता, घोटाळेबाज ऑनलाइन ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी नवनवीन शक्कल लढवत आहेत. या घोटाळ्यांमुळे अनेकांची बँक खातीदेखील रिकामी झाली आहेत. हे सायबर चोरटे लोकांचा पैसा लुटण्यासाठी वेगवेगळी तंत्रे अवलंबताना दिसतात. सायबर चोरट्यांच्या यूपीआय घोटाळ्याने नागरिकांची डोकेदुखी वाढवली आहे. अनेकांची घरं उध्वस्त झाली आहेत. या प्रकारात जेव्हा सर्वसामान्य माणूस अडकतो तेव्हा तो याचा कसा सामना करतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘फ्रॉम चायना विथ लव्ह’ हा चित्रपट होय. (Upcoming Movie From China With Love Trailer Launch)

‘फ्रॉम चायना विथ लव्ह’ चित्रपटाचा ट्रेलर लॉंच

नुकताच ‘फ्रॉम चायना विथ लव्ह’ या चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा पुण्यात अगदी दणक्यात साजरा झाला. यावेळी चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. हा सिनेमा आजपर्यंत भारतातील कुठल्याच भाषेतील फिल्म इंडस्ट्री बोलू शकली नाही अशा विषयावर भाष्य करतो.

online money fraud सध्याचं एक अदृश्य चक्रव्यूह आहे. ज्यात माणूस खूप सहजतेने अडकतो पण त्यातून बाहेर येण्याचा मार्ग काही त्याला सापडत नाही. एखादी सर्वसामान्य व्यक्ती जेव्हा या सगळ्यात अडकते तेव्हा काय काय घडतं आणि ते तुमच्या सोबत घडू नये असं वाटत असेल तर हा सिनेमा आवर्जून पाहायला हवा.

प्रदर्शित कधी होणार?

‘अनिकेत वाघ क्रिएशन’ अंतर्गत बनलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन,अभिनय,लेखन आणि निर्माता अशी चौफेर धुरा अनिकेत वाघ यानी उत्तमरित्या सांभाळली आहे. अनिकेत वाघसह या चित्रपटात अंकुश मांडेकर, सिद्धेश्वर झाडबुके, गायत्री बनसोडे, सोनाली भांगे, निलेश होले, प्रसाद खेडकर ही कलाकारांची फौज पाहायला मिळतेय. तर चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी प्रशांत फासगे यांनी सांभाळली आहे. तसेच चित्रपटाचे शीर्षक गीत कश्मिरा खोत हिने स्वरबद्ध केले आहे. जर तुम्हाला या ऑनलाइन फ्रॉडमध्ये अडकायचे नसेल तर नेमक काय करावं? हे पाहण्यासाठी येत्या 28 फेब्रुवारी 2025 रोजी हा चित्रपट जरूर पहा, असे आवाहन चित्रपटाच्या टीमने केले आहे.

हेही पहा –

Sai Tamhankar : हे वर्ष सईचं, बॉलिवूडच्या अपकमिंग प्रोजेक्ट्समध्ये साकारतेय विविधांगी भूमिका