मनोरंजनाच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज करायला कुणालाच आवडत नाही. त्यामुळे प्रेक्षक कायम आगामी काळात येणाऱ्या कलाकृतींबाबत जाणून घेण्यास उत्सुक असतात. दरम्यान, नव्या वर्षाचा पहिला महिना संपत आला आहे. त्यामुळे आगामी महिना मनोरंजनाच्या दृष्टीने काय घेऊन येणार? याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. येत्या फेब्रुवारी महिन्यात एकूण 6 सिनेमे प्रदर्शित होणार असून यातील काही सिनेमे बॉक्स ऑफिसवर एकमेकांना जोरदार टक्कर देणार आहेत. त्यामुळे हा महिना मनोरंजनाचा धमाका घेऊन येतोय, असे म्हणायला हरकत नाही. (Upcoming Movies in February 2025)
फेब्रुवारीत रिलीज होणाऱ्या सिनेमांमध्ये अभिनेता विकी कौशल, अर्जुन कपूर, जुनैद खानसारख्या कलाकारांच्या दर्जेदार कलाकृतींचा समावेश आहे. मुख्य म्हणजे, हे सिनेमे ओटीटीवर नव्हे तर थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहेत. चला तर जाणून घेऊया फेब्रुवारी 2025 मध्ये कोणकोणते सिनेमे रिलीज होत आहेत.
1. लवयापा
‘लवयापा’ हा सिनेमा येत्या 7 फेब्रुवारी 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अभिनेता जुनैद खान आणि अभिनेत्री खुशी कपूर मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाचा ट्रेलर अलीकडेच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.
2. बैडएस रवि कुमार
‘लवयापा’ सिनेमाला टक्कर देण्यासाठी 7 फेब्रुवारी 2025 रोजी ‘बैडएस रवि कुमार’देखील थिएटरमध्ये दाखल होतोय. हिमेश रेशमिया आणि प्रभुदेवाचा हा सिनेमा मनोरंजनाची एक लेव्हल अप करण्यासाठी येतोय. या सिनेमातून हिमेश रेशमिया पुन्हा एकदा रोमँटिक अंदाजात दिसेल. शिवाय त्याचा खतरनाक अंदाजही प्रेक्षकांना पहायला मिळेल.
3. छावा
गेल्या बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर ‘छावा’ सिनेमाची चर्चा आहे. हा सिनेमा छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर बेतलेला आहे. या सिनेमात अभिनेता विकी कौशल त्यांची भूमिका साकारणार आहे. तर अभिनेत्री रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत झळकणार आहे. या सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली आहे.
4. मेरे हसबैंड की बीवी
‘मेरे हसबैंड की बीवी’ हा सिनेमा 21 फेब्रुवारी 2025 रोजी सर्वत्र थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमातून अभिनेता अर्जुन कपूरसोबत बॉलिवूड सिनेविश्वातील 2 लोकप्रिय अभिनेत्री पहायला मिळणार आहेत. ज्यात अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि भूमी पेडणेकरचा समावेश आहे.
5. साको 363
‘साको 363’ हा सिनेमा एका सत्य कथेवर आधारित आहे. ज्यामध्ये बिष्णोई महिला अमृता देवीची गोष्ट दाखवण्यात आली आहे. जीने खेजरली गावातील प्राणी आणि वनस्पतींच्या रक्षणासाठी जोधाणा राज्याच्या दिवाणाशी लढा दिला होता. हा सिनेमा थिएटरमध्ये 28 फेब्रुवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे.
6. इन गलियों में
येत्या 28 फेब्रुवारी, 2025 रोजी ‘इन गलियों में’ हा सिनेमा ‘साको 363’ला टक्कर देताना दिसेल. या सिनेमाचे दिग्दर्शन अविनाश दास यांनी केले आहे. दिग्गज अभिनेता जावेद जाफरी हे या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसतील. त्यांच्यासह अभिनेता नसीरुद्दीन शाह यांचा मुलगा विवान शाह आणि अभिनेत्री भाग्यश्रीची लेक अवंतिका दासानी महत्वाच्या भूमिकेत दिसतील.
हेही पहा –
Saif Ali Khan Attack Case : सैफ हल्ला प्रकरणातील संशयिताची वाताहात, लग्न मोडले- नोकरीसुद्धा गेली