घरताज्या घडामोडीUpcoming Web Series & Films: डिसेंबर महिन्यात मनोरंजनाचा डबल डोस! दमदार...

Upcoming Web Series & Films: डिसेंबर महिन्यात मनोरंजनाचा डबल डोस! दमदार सिनेमा अन् वेब सीरीजचा धमाका

Subscribe

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे प्रदर्शनापासून रखडलेले अनेक मोस्ट अवटेट सिनेमे आणि वेब सीरीज आपल्याला डिसेंबर महिन्यात पाहता येणार

वर्षाच्या शेवटच्या महिना सुरू आहे आणि डिसेंबर म्हटलं की मज्जा मस्ती आली. डिसेंबर महिना प्रेक्षकांसाठी खास असणार आहेत. कारण या महिन्यात अनेक सिनेमे आणि वेब सीरीज प्रदर्शित होणार आहेत. ( Upcoming Web Series & Films in December) कोरोना आणि लॉकडाऊनमुळे प्रदर्शनापासून रखडलेले अनेक मोस्ट अवटेट सिनेमे आणि वेब सीरीज आपल्याला डिसेंबर महिन्यात पाहता येणार आहेत.  डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणारे सुपरहिट सिनेमे आणि वेब सीरीज कोणत्या आहेत जाणून घ्या.

मनी हाइस्ट सीझन ५

- Advertisement -

तमाम मनी हाइस्टच्या चाहत्यांची प्रतिक्षा संपली आहे कारण मनी हाइस्टच्या पाचव्या सीझनचा दुसरा पार्टमधील शेवटचा एपिसोड  ३ डिसेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे आता प्रोफेसर आणि त्यांची संपूर्ण टीमचं काय झाल? बँक ऑफ स्पेनमधून सोन चोरी करण्यात ते यशस्वी झाले की स्पेशल फोर्सच्या निशाण्यावर आले? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शेवटचा एपिसोड पाहिल्यानंतर मिळणार आहे.

इनसाइड एज सीजन ३

- Advertisement -

अमॅझोन प्राइमवर इनसाइट एज सीझन ३ ही वेब सीरीज देखील  ३ डिसेंबरला प्रदर्शित झाली आहे. यात विवेक ओबेरॉय आणि ऋचा चड्डा हे प्रमुख कलाकार आहेत. क्रिकेट जगतात होणारी सट्टेबाजी आणि ग्लॅमरस दुनियेवर ही सीरीज आधारित आहे.

 

बॉब बिस्वास

द बिग बुल सिनेमानंतर अभिनेता अभिषेक बच्चनचा बॉब बिस्वास सिनेमा देखील ३ डिसेंबरला प्रदर्शित झाला आहे. झी ५ वर हा सिनेमा पाहता येईल. संपू्र्ण सिनेमा हा सस्पेंन्सही भरलेला आहे.

 

पुष्पा: द राइज – पार्ट १

अभिनेता अल्लू अर्जुनचा मोस्ट अवटेट पुष्पा: द राइज – पार्ट १ हा सिनेमा ७ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. अल्लू अर्जुन पहिल्यांदाच अभिनेत्री रश्मिका मंदानासोबत स्क्रिन शेअर करणार आहे.

 

आर्य २

आर्य सीझन वनच्या कमाल प्रतिसादानंतर सुष्मिती सेनची आर्य २ ही वेब सीरीज १० डिसेंबरला प्रेक्षकांना डिस्नी प्लस हॉटस्टारवर पाहता येणार आहे. पहिल्या दमदार सीझननंतर आर्य २ कडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

अरण्यक

बऱ्याच वर्षांनी अभिनेत्री रवीना टंडन अरण्यक या वेब सीरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. १० डिसेंबरला ही सीरीज नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे. रवीना टंडण आशुतोष राणा,जाकीर हुसैन,मेघना मलिक या सीरीजमध्ये मुख्य भूमिकेत आहेत.

चंदीगड करे आशिकी

अभिनेता आयुषमान खुराना आणि अभिनेत्री वाणी कपूर यांचा चंदीगड करे आशिकी हा सिनेमा १० डिसेंबरला थिएटरमध्ये पाहता येणार आहे. एक फिटनेस प्रोव्हाइडर आणि झुम्बा टीचरमधली हलकी फुलकी प्रेमकहाणी सिनेमात पहायला मिळणार आहे.

डिकपल्ड

अभिनेत्री सुरवीन चावला पुन्हा एकदा डिकपल्ड या सिनेमात दिसणार आहे. अभिनेता आर माधवन सिनेमात प्रमुख भूमिकेत आहे. १७ डिसेंबरला हा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

स्पायडर मॅन नो वे होम

स्पायडर मॅन नो वे होम हा इंग्रजी भाषेतला सिनेमा असून १७ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा विविध भाषेत प्रदर्शित केला जाणार आहे. जगभरातील लोक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

अतरंगी रे

सारा अली खान,अक्षय कुमार,धनुष अशी तगडी स्टारकास्ट असलेला अतरंगी रे हा सिनेमा २४ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. सिनेमागृहात तसेच हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील सिनेमा पाहता येणार आहे. सिनेमाच्या ट्रेलर प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. अक्षय, सारा आणि धनुष हे अतरंगी कलाकार पहिल्यांदा या सिनेमातून एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत.

83

१९८३च्या भारताच्या पहिल्या वहिल्या वर्ल्ड कपची कहाणी आणि क्रिकेटर कपिल देत यांच्या जिवनावर आधारित हा सिनेमा २४ डिसेंबरला पाहता येणार आहे. दीपिका पादुकोण आणि रणवीर पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत.

जर्सी

डिसेंबरलाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच ३१ डिसेंबरला शाहिद कपूरचा जर्सी हा सिनेमा तुम्हाला पाहता येणार आहे. जर्सी या तमिळ सिनेमाचा हा हिंदी रिमेक आहे. कबीर सिंगनंतर थेट शाहिद जर्सीमधून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. शाहिद सोबत अभिनेत्री मृणाल ठाकून सिनेमात दिसणार आहे.


हेही वाचा - मुंबई दहशतवादी हल्ल्यावर आधरित चित्रपट आणि वेबसीरिज कोणत्या?

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -