नवीन वर्षातील पहिल्या महिन्याची सांगता होताना प्रेक्षकांना आगामी महिन्यातील नव्या गोष्टींची चाहूल लागली आहे. थिएटरमध्ये रिलीज होणाऱ्या सिनेमांसोबतच प्रेक्षक ओटीटीवर रिलीज होणाऱ्या सिनेमांबाबतदेखील तितकेच उत्सुक आहेत. आजकाल बरेच प्रेक्षक घरबसल्या मनोरंजनाचा पर्याय निवडतात. त्यामुळे गेल्या काही काळात ओटीटी प्लॅटफॉर्मला चांगली डिमांड आली आहे. त्यानुसार विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या विषयांवर आधारित कलाकृती प्रदर्शित होताना दिसतात. आज आपण येत्या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या सिनेमा आणि सिरीजविषयी जाणून घेणार आहोत. (Upcoming OTT Release Series And Film Update)
1. दीदी
‘दीदी’ हा एक कॉमेडी-ड्रामा जॉनरचा सिनेमा आहे. ज्याचा प्रीमियर गतवर्षी एका फिल्म फेस्टिवल झाला होता. हा सिनेमा 26 जानेवारी, 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर आता 26 जानेवारी 2025 रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म जीव सिनेमावर रिलीज केला जाणार आहे.
2. सीक्रेट ऑफ शिलेदार्स
दिग्दर्शक आदित्य सरपोतदारची ट्रेजर हंट सीरीज ‘सीक्रेट ऑफ शिलेदार्स’देखील फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित होते आहे. या सीरीजमध्ये प्रसिद्ध अभिनेता राजीव खंडेलवाल मुख्य भूमिकेत आहे. माहितीनुसार, ही सीरीज येत्या 31 जानेवारी, 2025 रोजी डिज्नी प्ल्स हॉटस्टारवर रिलीज होईल.
3. धूम धाम
आगामी महिन्यात ऍक्शन- कॉमेडी ड्रामा ‘धूम- धाम’ प्रदर्शित होणार आहे. या सिनेमातून यामी गौतम आणि प्रतीक गांधी एकत्र झळकणार आहेत. अलीकडेच या सिनेमाचा टिझर रिलीज झाला आहे. जो 1 मिनिट 31 सेकंदाचा असून प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा आहे. माहितीनुसार, हा सिनेमा येत्या 14 फेब्रुवारी 2025 रोजी लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.
4. द ट्रायल सीजन 2
‘द ट्रायल सीजन 2’ हा एक कोर्टरूम ड्रामा आहे. ज्यामध्ये अभिनेत्री काजोल मध्यवर्ती भूमिकेत दिसतेय. हा सिनेमा भ्रष्टाचार आणि सेक्स स्कैंडलवर आधारलेला आहे. माहितीनुसार, हा सिनेमा फेब्रुवारीत ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज होईल.
5. गेम चेंजर
दाक्षिणात्य अभिनेता राम चरण आणि बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी अभिनित ‘गेम चेंजर’ हा सिनेमा 10 जानेवारी 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. आतापर्यंत या सिनेमा 147 करोड रुपये इतकी कमाई केली असून आता लवकरच हा सिनेमा ओटीटीवर येणार असल्याचे सांगितले जात आहे. अद्याप तशी अधिकृत तारीख समोर आलेली नाही. मात्र, आगामी महिन्यात ओटीटी रिलीजची शक्यता वर्तवण्यात आली आहे.