उर्दू पाकिस्तानची नाही भारताची भाषा… जावेद अख्तर यांचे व्यक्तव्य पुन्हा चर्चेत

ज्येष्ठ गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर अनेकदा समाजातील विविध विषयांवर भाष्य करत असतात. ज्यामुळे ते सतत चर्चेत असतात. अशातच आता यांनी त्यांची पत्नी शबाना आजमीसोबत मिळून एक उर्दू अल्बम ‘शायराना सरताज’ लॉन्च केला. जिथे त्यांनी सर्वांना उर्दू भाषेचं महत्त्व सांगितलं. त्यावेळी त्यांनी उर्दू भाषा भारताची भाषा असल्याचं म्हटलं आहे.

उर्दू पाकिस्तानची नाही भारताची भाषा आहे- जावेद अख्तर

नुकत्याच पार पडलेल्या जावेद अख्तर यांच्या उर्दू अल्बम ‘शायराना सरताज’ लॉन्चवेळी जावेद अख्तर यांनी उर्दू भाषेबाबत भाष्य केलं. जावेद अख्तर यांच्या मते उर्दू भाषेच्या विकासात पंजाबचा मोठा वाटा आहे. ते म्हणाले, “उर्दू इतर कोणत्याही ठिकाणाहून आलेली नाही. ती आपल्या भारताची भाषा आहे. ती भारताबाहेर बोलली जात नाही. ती पाकिस्तान किंवा इजिप्तची भाषा नाही. पाकिस्तानही पूर्वी अस्तित्वात नव्हता. तोही भारतातूनच निघाला आहे.”

जावेद अख्तर

पुढे जावेद अख्तर उर्दूबद्दल बोलताना म्हणाले की, “आपण ही भाषा (उर्दू) का सोडली, पाकिस्तानमुळे ? जर पाकिस्तान म्हणतो की काश्मीर त्यांचे आहे, तर तुम्ही ते मान्य कराल. त्याचप्रमाणे उर्दू ही देखील भारताची भाषा आहे. ज्याकडे आपण सर्वांनी लक्ष द्यायले हवे. आजकाल नवीन पिढीचे लोक इंग्रजीवर अधिक लक्ष केंद्रित करतात. तरुण पिढी आणि लोक उर्दू आणि हिंदी कमी बोलतात. आपण हिंदीत बोलायला हवं, कारण ही आपली राष्ट्रभाषा आहे. भाषेचा संबंध कोणत्याच धर्माशी नसतो तो क्षेत्रावर आधारित असतो. जर भाषेचा संबंध धर्माशी असतात तर संपूर्ण यूरोपमध्ये एकच भाषा बोलली जाती.”

 


हेही वाचा :

अभिनेत्री हेमा मालिनी बॅलेतून सादर करणार ‘गंगा’चा प्रीमिअर