चित्रा वाघ यांना ‘चित्रू’ म्हणत उर्फीने पुन्हा डिवचलं

अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद नेहमीच तिच्या अतरंगी कपड्यांमुळे सतत चर्चेत असते. अनेकदा उर्फीला तिच्या कपड्यांमुळे सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. या ट्रोलर्सला उर्फी नेहमीच सडेतोड उत्तर देतान दिसते. याच कारणामुळे अलीकडच्याच काळात उर्फीच्या कपड्यांवरुन पोलिस तक्रार देखील करण्यात आली होती. दरम्यान, मागील दोन-तीन दिवसांपासून भाजपा नेत्या चित्रा वाघ देखील उर्फी जावेदच्या कपड्यांवरुन सतत संताप व्यक्त करत आहेत. शिवाय उर्फी देखील त्यांच्या विरोधाला सडेतोड उत्तर देत आहे.

मागील चार दिवसांपासून सुरु असलेल्या चित्रा वाघ आणि उर्फीच्या वादाकडे सर्वांचेच लक्ष वेधले आहे. दरम्यान, आता उर्फीने आणखी एक ट्वीट केलंय ज्यात तिने चित्रा वाघ यांना चक्क चित्रू म्हटलं आहे. उर्फीने या ट्वीटमध्ये लिहिलंय की, “आता आपण लवकरच मैत्रिणी होऊ चित्रू” असं उर्फीने लिहिलंय. सध्या उर्फीचं हे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटकरी आपल्या प्रतिक्रिया देखील देताना दिसत आहेत. आता उर्फीच्या या ट्वीटला चित्रा वाघ नक्की काय प्रतिक्रिया देतात. हे याकडे सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

उर्फीचं याआधीचं ट्वीट

मंगळवारी उर्फीने संजय राठोड यांना मिळालेल्या क्लीनचिटवरून प्रश्न उपस्थित करत चित्रा वाघ यांना सवाल केला. तिने ट्वीटमध्ये लिहिलं होत की, “भाजपामध्ये आल्यानंतर तुमच्यासोबत घनिष्ठ मैत्री करण्यासाठी मी आतुर आहे. तुम्हाला संजय आठवतोय का चित्राजी? तुम्ही भाजपात प्रवेश केल्यानंतर तुमची तर त्यांच्यासोबत खूप चांगली मैत्री झाली. एनसीपीत असताना तुम्ही त्यांच्याविरोधात इतका हल्लाबोल केला, पण भाजपामध्ये आल्यानंतर तुम्ही त्यांच्या सर्व चुका विसरलात,” असा टोला उर्फीने लगावला होता.


हेही वाचा :

चित्राजी, संजय आठवतोय का? उर्फी थेट वाघांना भिडली