आपल्या अतरंगी स्टाईलमुळे सतत चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदच्या अनोख्या स्टाईलचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. अनेकजण तिच्या हटके स्टाईलचं कौतुक करतात तर काहीजण तिला प्रचंड ट्रोल देखील करत असतात. मात्र, उर्फी कोणालाही न घाबरता सडेतोड उत्तर देताना दिसते. दरम्यान अशातच, उर्फीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने गुलाबी रंगाचा बॅकलेस ड्रेस घातला आहे.
उर्फीचा बॅकलेस ड्रेस चर्चेत
नुकतेच उर्फीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत ज्यामध्ये उर्फीने सूट घातलेला दिसत आहे. यातील पहिल्या फोटोत उर्फी संपूर्ण सूटमझध्ये दिसतेय मात्र, दुसऱ्या फोटोत तिने बॅकलेस सूट घातल्याचे दिसून येते. उर्फी जावेदचे फोटो पाहून सोशल मीडिया यूजर्स कमेंट करत आहेत. उर्फी जावेदच्या पोस्टवर एका यूजरने लिहिलंय की, तुझा पहिला फोटो पाहून असं वाटलं की, ती उर्फी नाही. मात्र, दुसऱ्या फोटोत ती उर्फीच असल्याचं स्पष्ट झालं.
‘बिग बॉस ओटीटी ’मुळे मिळाली प्रसिद्धी
उर्फीने बिग बॉस ओटीटीमधून प्रसिद्धी मिळाली. उर्फी ही बिग बॉसमध्ये फार काळ नव्हती. पण, बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर उर्फीने वेगळ्या फॅशन सेन्सने सर्वांचे लक्ष वेधले. यानंतर उर्फीला सोशल मीडियावर अल्पावधीत प्रसिद्धी मिळाली.