घरमनोरंजनआक्षेपार्ह पेहरावावरून पोलीस ठाण्यात तक्रार केल्याबद्दल उर्फीने व्यक्त केला संताप

आक्षेपार्ह पेहरावावरून पोलीस ठाण्यात तक्रार केल्याबद्दल उर्फीने व्यक्त केला संताप

Subscribe

सोशल मीडियावर आपल्या अतरंगी कपड्यांमुळे प्रसिद्ध असलेली अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेदच्या अडचणीत वाढ झाली. उर्फीच्या रोजच्या चित्र-विचित्र फॅशनला कंटाळून मुंबईतील एका वकीलाने स्वतः अंधेरी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. 11 डिसेंबर रोजी वकील अली काशिफ खान देशमुख यांनी तिच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. दरम्यान, आता उर्फीने या तक्रारीबाबत आपली प्रतिक्रिया सोशल मीडिया अकाऊंटवरुन दिली आहे.

तक्रार केल्यामुळे उर्फी संतापली

- Advertisement -


उर्फी जावेद अश्लील पोशाख परिधान करुन समाजात आणि सोशल मीडियावर अश्लीलता पसरवते असा आरोप तिच्यावर करण्यात आला. वकील अली काशिफ खान देशमुख यांनी लिखित स्वरुपात अर्ज देत अशी तक्रार दाखल केली. या तक्रारीवर आता उर्फीने आपला राग व्यक्त केला आहे. इंस्टाग्राम स्टोरीमध्ये उर्फीने लिहिलंय की, “माझ्या विरुद्ध आणखी एक तक्रार! व्वा…मला आश्चर्य वाटतंय की, मला जीवे मारण्याची आणि बलात्काराची धमकी देणाऱ्यांबद्दल लोकांचा कसलाही आक्षेप किंवा अडचण नाही. तुम्हाला फक्त माझ्या पेहरावामुळे त्रास होतोय, पण बलात्कार आणि खूण करणाऱ्यांचा नाही?”

- Advertisement -

उर्फीने नारंगी रंगाच्या ड्रेसमध्ये देखील एक फोटो शेअर करत खाली लिहिलंय की, “मी हॉटेलमध्ये आहे. मी इथे खूप छान दिसतेय. कृपया हा व्हिडीओ न्यायालयात पुरावा म्हणून दाखवा.”

उर्फी जावेदवर समाजात अश्लीलता पसरवण्याचा आरोप
उर्फी जावेद अश्लील पोशाख परिधान करुन समाजात आणि सोशल मीडियावर अश्लीलता पसरवते असा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. वकील अली काशिफ खान देशमुख यांनी लिखित स्वरुपात अर्ज देत अशी तक्रार दाखल केली आहे. शिवाय उर्फीच्या फॅशनला सोशल मीडियावर वाईट पद्घतीने अनेकजण ट्रोल देखील करतात मात्र तरीही तिच्यावर कोणताच परिणाम होत नाही. ती प्रत्येकवेळी ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देते.

 


हेही वाचा :

उर्फी जावेदच्या फॅशनला कंटाळून वकिलानेच केली तक्रार

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -