माझ्या कपड्यांमुळे… मुंबईत भाड्याने घर न मिळाल्याने उर्फीची खंत

मॉडेल उर्फी जावेद सतत तिच्या अतरंगी कपड्यांमुळे चर्चेत असते. यावरुन अनेकजण तिला ट्रोल देखील करत असतात. मागील काही दिवसांपासून उर्फी आणि चित्रा वाघ यांच्यात रंगलेल्या सोशल मीडियावरील वादानंतर आता उर्फी पुन्हा एकदा आणखी एका कारणामुळे चर्चेत आली आहे. आता उर्फी सध्या मुंबईमध्ये भाड्याने घर शोधत आहे पण तिला मुंबईमध्ये राहण्यासाठी भाड्याने घर मिळत नाही. ती मुस्लिम असल्यामुळे आणि तिच्या कपड्यांमुळे तिला कोणीही घर भाड्याने द्यायला तयार नाही. असं तिने सांगितलं.

कपड्यांमुळे उर्फीला मिळेना घर

उर्फीने ट्वीट शेअर करत लिहिलं की, “मी ज्या प्रकारचे कपडे घातले त्यामुळे मुस्लिम घराचे मालक मला भाड्याने घर द्यायला तयार नाही तर हिंदू मालक मी मुस्लिम असल्यामुळे तिला भाड्याने घर द्यायला तयार नाहीत. तर राजकारण्यांकडून मला मिळत असेल्या धमक्यांमुळे काही घर मालकांना मला भाड्याने घर द्यायचे नाही. मुंबईमध्ये भाड्याने घर शोधणं खूप कठीण झालं आहे.”

भाजपा नेता चित्रा वाघ यांनी केली होती तक्रार
नुकत्याच काही दिवसांपूर्वी उर्फी मुंबई पोलिसांनी समन्स पाठवला होता. उर्फी विरोधात भाजपा नेता चित्रा वाघ यांनी तक्रार दाखल केली होती. उर्फी सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता पसरवत असल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला होता.

 


हेही वाचा :

‘गोल्डन ग्लोब पुरस्कारा’नंतर आता ‘नाटू नाटू’ गाण्याची ऑस्कर अवॉर्डमध्ये एन्ट्री