घरमनोरंजनउर्फी एक स्त्री आहे, तिला जे हवं ते ती करू शकते...; अमृता...

उर्फी एक स्त्री आहे, तिला जे हवं ते ती करू शकते…; अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया

Subscribe

सोशल मीडिया स्टार उर्फी जावेद सध्या तिच्या कपड्यांमुळे वादात सापडली आहे. तिच्या कपड्यांवरून अनेकांनी तिला टार्गेट केले. सोशल मीडियावरचं नाही तर राज्याच्या राजकारणात आता उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांचा मुद्दा गाजतोय. उर्फी सार्वजनिक ठिकाणीही अतिशय तोकड्या कपड्यात फिरते. त्यामुळे पब्लिसिटी स्टंटसाठी ती असं करत असल्याचे अनेकांचे मत आहे. यावरूनच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदला टार्गेट केले आहे. मागील अनेक दिवसांपासून दोघींमध्ये सध्या सोशल मीडियावरून शाब्दिक वाद सुरु आहे. दरम्यान, आता या प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांशी बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, “चित्रा वाघ यांनी देखील याबाबत भूमिका मांडली आहे की, असे पब्लिसिटी स्टंट करणं काहींची व्यावसायिक गरज असते, त्यांना अशा प्रकारचे सीन करावे लागतात. परंतु तुम्ही केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी रस्त्यावर तसे फिरत असाल, तर ते अजिबात योग्य नाही. उर्फी एक कलाकार असली तरी तिने सार्वजनिक ठिकाणी जाताना संस्कृती जपली पाहिजे. तुमचे व्यवसायिक आयुष्य आणि सार्वजनिक आयुष्य वेगळे असते.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

- Advertisement -

पुढे त्या म्हणाल्या की, “अशा गोष्टींवर प्रत्येकाचे वेगवेगळे मत असू शकते. चित्रा वाघ यांचे विचार त्या व्यक्त करत आहेत. त्यामुळे त्या कारवाई करत आहेत. परंतु उर्फी जे करते ते फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी आहे. जर हे काम व्यावसायिक असतं तर ठीक होतं. परंतु सार्वजनिक ठिकाणी संस्कृती जपायला हवी. वैयक्तिक सांगायचे झाल्यास उर्फी एक स्त्री आहे तिला जे हवं ते ती करु शकते. त्यामध्ये मला काहीही वेगळं वाटत नाही.”

 

- Advertisement -

हेही वाचा :

5000 वर्षे क्षुद्र स्त्रियांना…; उर्फी प्रकरणात जितेंद्र आव्हाडांची उडी

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -