Urfi Javedचा Kacha Badamवर बॅकलेस टॉप डान्स, नेटिझन्स म्हणाले…

व्हिडीओमध्ये उर्फी जावेद रस्त्याच्या कडेला कच्चा बादामवर ठुमके देताना दिसतेय. उर्फीने ब्लू डेनिम जीन्सवर ब्लॅक कलरचा बॅकलेस टॉप घातला आहे. कच्चा बादामवर नाचताना उर्फीचा बॅकलेस टॉप पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. 'कच्चा बादाम! बादाम बादाम!' असे कॅप्शन देत उर्फीने व्हिडीओ शेअर केला आहे.

Urfi Javed dance on Kacha Badam with flaunts her sexy moves in backless top video viral on social media
Urfi Javedचा Kacha Badamवर बॅकलेस टॉप डान्स, नेटिझन्स म्हणाले...

सोशल मीडियावर सध्या ‘कच्चा बादाम’ (Kacha Badam)  हे बंगाली गाणे ट्रेडींगमध्ये आहे (Social Media Trend)  अनेक जण या गाण्यावर रिल्स तयार करत आहेत. नेटिझन्स कच्चा बादाम गाण्याचे फॅन झाले आहेत. पश्चिम बंगालमधील शेंगदाणे विकणाऱ्या भुवन बादायकरने हे गाणे गायले आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांनी देखील या गाण्यावर ठेका धरला आहे. सोशल मीडियावर सतत आपल्या विचित्र फॅशन स्टाइलमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री उर्फी जावेदने (Urfi Javed)  देखील कच्चा बादामवर गाण्यावर ठेका धरत पुन्हा एकदा तिचा जलवा दाखवून दिला आहे. उर्फी तिच्या चित्र विचित्र स्टाइलमुळे चर्चेत असतेच यावेळी देखील तिने बॅकलेस टॉप घालून कच्चा बादामवर रिल्स केला आहे. तिच्या या बॅकलेस टॉपमुळे तिला चांगलेच ट्रोल करण्यात आले आहे.

व्हिडीओमध्ये उर्फी जावेद रस्त्याच्या कडेला कच्चा बादामवर ठुमके देताना दिसतेय. उर्फीने ब्लू डेनिम जीन्सवर ब्लॅक कलरचा बॅकलेस टॉप घातला आहे. कच्चा बादामवर नाचताना उर्फीचा बॅकलेस टॉप पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. ‘कच्चा बादाम! बादाम बादाम!’ असे कॅप्शन देत उर्फीने व्हिडीओ शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Urrfii (@urf7i)

उर्फीच्या या व्हिडीओवर नेहमी प्रमाणे तिला ट्रोल करण्यात आले आहे. काहींनी उर्फीला ‘ब्यूटी क्विन’ म्हटले आहे तर काही जण उर्फीच्या क्यूटनेसवर फिदा झाले आहेत. ‘तु फार हॉट आहेस, तुला पाहून आज माझा दिवस सार्थकी लागला’ असे देखील अनेकांनी म्हटले आहे. उर्फीचा बॅकलेस टॉप डान्स पाहून एका युझरने ‘अरे उर्फी मागे काही घातले आहेस की नाही’, अशी कमेंट केली आहे.

उर्फीच्या वर्क फ्रंट विषयी बोलायचे झाले तर उर्फी बिग ओटीटीमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. मात्र पहिल्याच राऊंडमध्ये ती बाहेर पडली. त्यानंतर उर्फीने तिच्या फॅशन स्टाइलने सर्वांचे लक्ष वेधले. तिचे अनेक म्युझिक व्हिडीओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात.


हेही वाचा – RRR: अखेर प्रतिक्षा संपली! ‘या’ दिवशी रिलीज होणार ‘आरआरआर’