फॅशनची ही कोणती तऱ्हा ? उर्फी जावेदनं पायात नव्हे तर अंगावर घातल्या २ जीन्स

सध्या उर्फी पूर्ण कपडे घालून फिरत असल्याचं सांगत चित्रा वाघांनी तिचं कौतुक केलं. त्यानंतर पुन्हा उर्फीनं आपल्या अतरंगी कपड्यांची फॅशनची परंपरा सुरूच ठेवून आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

urfi-javed-pics-1-1675162773
(Image : Instagram/ viralbhayani)

उर्फी जावेद हे नाव जरी आलं तरी त्यापुढे ‘अतरंगी कपडे घालून फॅशन करणारी मॉडेल’ अशी ओळख सांगणारी ओळ ही आपोआपच येते. आतापर्यंत तोकडे कपडे घालून अंगप्रदर्शन करण्याचा आरोप उर्फी जावेदवर करण्यात येत होता. यावरून उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यासोबत सुरू असलेला वाद सगळ्यांनाच माहिती आहे. सध्या उर्फी पूर्ण कपडे घालून फिरत असल्याचं सांगत चित्रा वाघांनी तिचं कौतुक केलं. त्यानंतर पुन्हा उर्फीनं आपल्या अतरंगी कपड्यांची फॅशनची परंपरा सुरूच ठेवून आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

यापूर्वी उर्फी जावेद तोकड्या कपड्यांमध्ये अंगप्रदर्शन करताना दिसून येत होती. परंतू पहिल्यांदा उर्फी जावेद अंगभर कपड्यांमध्ये दिसून आली आहे. पण तिच्या या अंगभर कपडे घालण्याने सुद्धा ती चर्चेत आली आहे. याला कारणही तसंच आहे. उर्फी जावेदनं अंगभर कपडे परिधान केले खरे, परंतू यात तीने जीन्स पायात नव्हे तर अंगावर परिधान केलेली दिसून आली.

उर्फी जावेद मंगळवारी मुंबईतील जुहू परिसरात स्पॉट झाली आणि कॅमेऱ्यात कैद झाली. उर्फी जावेदचे अतरंगी ड्रेसमधील हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. उर्फी जावेदचे चाहते तिच्या ड्रेसवर सकारात्मक कमेंट करत आहेत आणि तिच्या स्माईलला पसंती देत आहेत. सोबतच अनेकांनी तर उर्फी जावेदला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे.

एका यूजरने लिहिले आहे की, ‘हे सर्व काय बघायला मिळतंय.’ एका यूजरने लिहिले आहे की, ‘ती असे काय अतरंगी प्रयोग करत राहते.’ दुसऱ्या एका यूजरने लिहिले की, ‘आधी एकही जीन्स घालत नव्हती आणि आज सरळ २-२ जीन्स?’ आणखी एका यूजरने लिहिले आहे की, ‘एक दिवस ती फॅशनच्या नादात जिवंत प्राण्याला फाशी देईल.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

उर्फी जावेदचा या ड्रेसमधील एक व्हिडीओही समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये पापाराझी तिला सांगतो की तू उलटी पँट घातली आहेस. यावर उर्फी सांगते की, “तिचा आउटफिट खराब झाला होता, म्हणून तिने लगेच पँटचा आउटफिट बनवला.” उर्फी जावेदच्या हातात तुटलेला मोबाईल दिसला. उर्फी जावेद पापाराझींना तुटलेला मोबाईल दाखवत होती.