घरमनोरंजनअर्ध्या वयाच्या मुलींना तुम्ही मेसेज करता... उर्फी जावेदने दिलं चेतन भगतला सडेतोड उत्तर

अर्ध्या वयाच्या मुलींना तुम्ही मेसेज करता… उर्फी जावेदने दिलं चेतन भगतला सडेतोड उत्तर

Subscribe

सोशल मीडियावर आपल्या अतरंगी कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत असणारी उर्फी जावेद तिच्या वक्तव्यांमुळे देखील चर्चेत असते. उर्फी विरोधात बोलणाऱ्यांना ती नेहमीच सडेतोड उत्तर देताना दिसते. दरम्यान, आता पुन्हा अशाच एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. प्रसिद्धा लेखक चेतन भगत यांनी काही दिवसांपूर्वी उर्फीबाबत एक वक्तव्य केले होते. जे ऐकल्यावर उर्फी चांगलीच संतापली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?
खरंतर, चेतन भगत ने साहित्य आज तक मध्ये उर्फी जावेदचा उल्लेख केला होता. त्यावेळी ते म्हणाले होते की, आजकालची तरुण पिढी उर्फीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर लाईक करण्यात वेळ वाया घालवत आहेत. हे त्यांच्या अभ्यासाचा भाग आहे का? की ते इंटरव्यूमध्ये जाऊन बोलणार की सर मला उर्फी जावेदचे सगळे ड्रेस माहित आहेत. तशी त्या बिचारीची काही चूकी नाही यात ती तर तिचं तिचं करतेय. ती तिचं करिअर करत आहे. एक भारतातील जवान आहेत जे देशाती रक्षा करत आहेत आणि एक आमचे आजकालचे तरुण उर्फी जावेदचे फोटो पाहत आहेत. तर यांचे काय होईल? आज पण मी पाहिलं उर्फीने दोन फोन घातले आहेत.

- Advertisement -

उर्फी जावेदने दिलं उत्तर


चेतन भगतचे हे वक्तव्य ऐकताच उर्फी जावेदने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन स्क्रिनशॉट्स शेअर केलंय. त्यात ट्वीटरीलवर एका यूजरने् लिहिलंय की चेतन भगतच्या मते उर्फी तरुणांची दिशा भूल करत असल्याचे सांगितले आहे. याबाबत उर्फीने लिहिलंय की, “मित्रांनो विसरु नका की कितीतरी महिलांनी मीटू दरम्यान यांच्यावर आरोप केले होते. तसेच ती पुढे म्हणाली की, जेव्हा आपल्या अर्धा वयाच्या मुलींना तुम्ही इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपला मॅसेज करत होता. तेव्हा पण त्या मुलींच्या कपड्यांनी तुमचे लक्ष वेधून घेतले होते का?” यासोबतच चेतन भगतने आपली माफी मागावी असं देखील म्हटलं.

- Advertisement -

 


हेही वाचा :

अभिनेता पुनीत इस्सरचा ई-मेल हॅक करणारा आरोपी ताब्यात

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -