तुम्हाला फॅशनची खूप समज… विवेक अग्निहोत्रींवर भडकली उर्फी जावेद

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री त्यांच्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. ते अनेकदा बॉलिवूड चित्रपट आणि बॉलिवूड कलाकारांवर निशाणा साधत असतात. नुकतेच विवेक अग्निहोत्री यांनी बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनबद्दल ट्विट केले होते. ज्यावर उर्फी जावेद चांगलीच संतप्त झाली असून तिने विवेक अग्निहोत्रींना ट्वीटरवरुन प्रत्युत्तरही दिलं आहे.

खरंतर, विवेक अग्निहोत्रींनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर ऐश्वर्या राय बच्चनचा कान्स 2023 च्या रेड कार्पेटचा फोटो पोस्ट केला आहे. रेड कार्पेटवर ऐश्वर्या राय बच्चन मोठ्या हुडाच्या गाऊनमध्ये दिसत आहे आणि एक व्यक्ती मागून तिचा ड्रेस हाताळत असल्याचे या फोटोत दिसत आहे. हा फोटो पोस्ट करत विवेकने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “तुम्ही ‘पोशाख गुलाम’ हा शब्द कधी ऐकला आहे, ज्यात बहुतांश मुली आहेत. तुम्ही त्यांना भारतातील प्रत्येक महिला सेलिब्रिटींसोबत पाहू शकता. अशा अस्वस्थ फॅशनसाठी आपण इतके मूर्ख आणि दडपशाही का बनत आहोत?”

उर्फी जावेदने विवेक अग्निहोत्रीला दिलं उत्तर

विवेक अग्निहोत्रीचे हे ट्विट वाचून उर्फी जावेदने त्यांना प्रत्यत्तर दिलं आहे. ट्विटला उत्तर देताना उर्फी जावेदने लिहिलंय की, “मला जाणून घ्यायचे आहे की तुम्ही कोणत्या फॅशन स्कूलमधून पदवी घेतली आहे? तुम्हाला पाहून वाटतं की तुम्हाला फॅशनची खूप समज आहे, तुम्ही फॅशन चित्रपट पाहिल्यानंतर दिग्दर्शन करायला हवं होतं.”

दरम्यान, कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 मध्ये सहभागी झाल्यानंतर ऐश्वर्या राय बच्चन मुंबईत परतली आहे. ऐश्वर्या राय व्यतिरिक्त, सारा अली खान, मानुषी छिल्लर आणि मृणाल ठाकूर यांसारख्या स्टार्सनी यावर्षी फेस्टिव्हलमध्ये भाग घेतला आहे.


हेही वाचा :

रत्नागिरीत भरत जाधव यांनी व्यक्त केली नाराजी, नेमके कारण काय ?