घरमनोरंजनउर्फी जावेद किन्नर? 'या' अभिनेत्याने केला दावा

उर्फी जावेद किन्नर? ‘या’ अभिनेत्याने केला दावा

Subscribe

आपल्या अतरंगी स्टाईलमुळे सतत चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदच्या अनोख्या स्टाईलचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. अनेकजण तिच्या हटके स्टाईलचं कौतुक करतात तर काहीजण तिला प्रचंड ट्रोल देखील करत असतात. मात्र, उर्फी कोणालाही न घाबरता आपली फॅशन आणि कपडे यांच्यात कोणताच बदल करत नाही. दरम्यान, आता अशातच अभिनेता फैजान अन्सारीने उर्फी जावेद तृतीयपंथी असल्याचं धक्कादायक वक्तव्य केलं आहे.

एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता फैजान अन्सारीने उर्फी जावेद तृतीयपंथी असल्याचा दावा केला आहे. तो म्हणाला की, “उर्फी तृतीयपंथी असल्याचे काही पुरावे माझ्याकडे आहेत. ज्याच्या आधारे मी देशासमोर मोठा खुलासा करणार आहे. उर्फी जावेद मुलगी नसून ती एक तृतीयपंथी आहे. ती ज्या पद्धतीने बोलते. ज्याप्रकारचे कपडे घालते, यावरुन हे सिद्ध होतं.” असं अन्सारीने म्हटलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

- Advertisement -

फैजान अन्सारी पुढे म्हणाला की, “माझ्या टीमने उर्फीशी बोलण्याचा प्रयत्न केला होता पण ती सगळ्यांशी खूप उद्धटपणे बोलते. मुस्लिम समाजाशी तिचा काहीही संबंध नाही, असे तिचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत आता तिच्याशी बोलून काही उपयोग नाही. तिला थेट धडा शिकवणे योग्य ठरेल. मुस्लिम असल्यामुळे ती अशा प्रकारे आमचे नाव बदनाम करत आहे, मी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही. त्यामुळे तिचे सत्य लवकरात लवकर लोकांसमोर यावे आणि तिने स्वतःहून तृतीयपंथी समाजात सामील व्हावे, अशी माझी इच्छा आहे.” असं अन्सारीने म्हटलं आहे. दरम्यान, फैजान अन्सारीने याआधी देखील खूप वेळा उर्फीवर निशाना साधला आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा :

प्रियंका चोप्राचा मोठा खुलासा! आई होण्यासाठी 30 व्या वर्षी गोठवलं होतं बीजांड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -