उर्फी जावेदला टक्कर देतोय हा पठ्ठ्या; कधी अंगाला भांडी, तर कधी झाडू आणि मिरच्या

आपल्या अतरंगी स्टाईलमुळे सतत चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदच्या अनोख्या स्टाईलचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. अनेकजण तिच्या हटके स्टाईलचं कौतुक करतात तर काहीजण तिला प्रचंड ट्रोल देखील करत असतात. मात्र, उर्फी कोणालाही न घाबरता आपली फॅशन आणि कपडे यांच्यात कोणताच बदल करत नाही. उर्फीच्या स्टाईल आणि कपड्यांमुळे सोशल मीडियावर अनेक क्रांतिकारी बदल होत आहेत. सध्या सोशल मीडियावर उर्फी प्रमाणे अनेकजण अतरंगी फॅशन करु लागले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tiktoker Tharun (@tik_toker_tharun)

सध्या इंस्टाग्रामवर उर्फीप्रमाणे फॅशन करणाऱ्या मुलाचे व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहेत. ज्यात त्याने स्वतःच्या अंगाला भांडी, मिरच्या, झाडू अशा वेगवेगळ्या वस्तू लावल्या आहेत. त्याची स्टाईल उर्फीपेक्षा जबरदस्त असल्याचं म्हटलं जात आहे. शिवाय त्याचे इंस्टाग्रामवर लाखो चाहते देखील आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tiktoker Tharun (@tik_toker_tharun)

या व्यक्तीचं नाव तरुण आहे शिवाय त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटचे नाव टिक_टोकर_थारुण असं आहे.

तरुणचे इंस्टाग्रामवर इंस्टाग्रामवर 3 लाख 60 हजार लोक फॉलो करतात.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Tiktoker Tharun (@tik_toker_tharun)

यातील काही व्हिडीओमध्ये तरुणने लाल मिरचीपासून तयार केलेला ड्रेस तर कधी केळीच्या पानांचा ड्रेस घातला आहे. तरुणची अनोखी स्टाईल पाहून नेटकरी याच्यासमोर उर्फी देखील फिकी पडत असल्याचं म्हटलं आहे.

 


हेही वाचा :

पंजाबी अभिनेता अमन धालीवालवर जीममध्ये अज्ञात व्यक्तीकडून हल्ला; व्हिडीओ व्हायरल