घरमनोरंजनउर्फी जावेद 'या' कारणामुळे घालते कमी कपडे, Video पोस्ट करत केला खुलासा

उर्फी जावेद ‘या’ कारणामुळे घालते कमी कपडे, Video पोस्ट करत केला खुलासा

Subscribe

सोशल मीडिया स्टार उर्फी जावेद सध्या तिच्या कपड्यांमुळे वादात सापडली आहे. तिच्या कपड्यांवरून अनेकांनी तिला टार्गेट केले. सोशल मीडियावरचं नाही तर राज्याच्या राजकारणात आता उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांचा मुद्दा गाजतोय. उर्फी सार्वजनिक ठिकाणीही अतिशय तोकड्या कपड्यात फिरते. त्यामुळे पब्लिसिटी स्टंटसाठी ती असं करत असल्याचे अनेकांचे मत आहे.

यावरूनच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदला टार्गेट केले आहे. दोघींमध्ये सध्या सोशल मीडियावरून शाब्दिक वाद सुरु आहे. पण उर्फीने आता एक व्हिडीओ पोस्ट करत ती तोकडे कपडे का घातले यामागचं कारण सांगितलं आहे. उर्फीने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत कमी कपडे घालण्याचे कारण सांगितले आहे. अतिशय तोकडे कपडे घालणं हा तिचा नाईलाज असल्याचे तिने म्हटले आहे.

- Advertisement -

उर्फीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिच्या हातावर आणि पायांवर पुरळ उठल्याचे दिसतेय. अंगावरील ही अॅलर्जी दाखवत उर्फी म्हणाली की, मला बऱ्याचदा विचारलं जातं की तू कमी कपडे का घालतेस, याचं कारण म्हणजे कपड्यांमुळे माझ्या अंगावर अॅलर्जी येत आहे. जेव्हा मी अंगभर कपडे किंवा लोकरीचे कपडे घातले तेव्हा मला अंगावर अशी अॅलर्जी येते. म्हणून मी नेहमी कमी कपड्यांमध्ये तुम्हाला दिसते. म्हणून ही अॅलर्जी टाळण्यासाठी कमी कपडे घातले. उर्फीचा हा नवा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

- Advertisement -

उर्फी जावेद परखडपणे बोलण्यासाठी ओळखली जाते. अलीकडेच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदवर तिच्या कपड्यांमुळे कारवाई करण्याची मागणी केली होती. उर्फी जावेद तोकडे कपडे घालून सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता पसरतव असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला. तेव्हापासून सोशल मीडियावर दोघांमध्ये शाब्दिक वाद सुरु आहे. उर्फीचित्रा वाघ यांच्या टीकेला सातत्याने प्रत्युत्तर देत आहे. तसेच आपण काहीच चुकीचं करत नसल्याचं म्हणत कोणतीही भीती बाळगण्याची गरज नसल्याचं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.

मात्र उर्फी जावेदने शेअर केलेल्या नव्या व्हिडीओमुळे या वादावर पडदा पडणार का किंवा किती युजर्स तिच्या विधानावर सहमती दर्शवतील, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.


अमृता फडणवीस यांचं ‘अज मैं मूड बणा लेया’ गाणं प्रदर्शित; अल्पावधीत गाण्याला लाखो व्ह्यूज

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -