‘मी जावेद अख्तर यांची नात नव्हे’ ट्रोलर्सला Urfi Javedचं थेट उत्तर

जावेद अख्तर यांची पत्नी शबाना आजमी यांनी स्वत: समोर येऊन उर्फीचा आमच्या कुटुंबाशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र उर्फीचे ट्रोलिंग काही थांबत नव्हते. शेवटी ट्रोलिंग आणि टोमण्यांना कंटाळलेल्या उर्फीने सगळ्यांची बोलती बंद करण्यासाठी एक भन्नाट शक्कल लढवली.

urfi javed spot at airport she was wearing T-shirt that said not javed akhtars granddaughter
'मी जावेद अख्तर यांची नात नव्हे' ट्रोलर्सला Urfi Javedचं थेट उत्तर

बिग बॉस ओटीटीची (Bigg Boss OTT )  स्पर्धक असलेली उर्फी जावेद (Urfi Javed)  तिच्या हॉट बोल्ड स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते. चित्र विचित्र कपडे ही जणू काही उर्फीची नवीन स्टाइल झाली आहे. उर्फी नेहमीच अतरंगी लूकमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. उर्फी तिच्या फॅन्सना कधीच नाराज करत नाही. उर्फीचे प्रत्येक सिजलिंग फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होत असतात. उर्फीच्या ड्रेसिंग सेन्समुळे अनेक जण तिचे कौतुक करतात तर अनेकवेळा तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. उर्फी तिच्या कपड्यांमुळे ट्रोल होत असते मात्र अलिकडे तिला तू गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar )  यांची नात आहेस जरा नीट रहायला आणि कपडे घालायला शिक असे म्हणून देखील ट्रोल केले जात होते. मात्र उर्फीने आता तिच्या हटके स्टाइलने तिच्या ट्रोलर्सना उत्तर दिले आहे. ( urfi javed spot at airport she was wearing T-shirt that said not javed akhtars granddaughter)

उर्फी बिग बॉस ओटीटीमधून बाहेर आल्यानंतर तिला तू जावेद अख्तर यांची नात असल्याचे म्हणत ट्रोल केले गेले. शिवाय जावेद अख्तर यांची पत्नी शबाना आजमी यांनी स्वत: समोर येऊन उर्फीचा आमच्या कुटुंबाशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र उर्फीचे ट्रोलिंग काही थांबत नव्हते. शेवटी ट्रोलिंग आणि टोमण्यांना कंटाळलेल्या उर्फीने सगळ्यांची बोलती बंद करण्यासाठी एक भन्नाट शक्कल लढवली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

उर्फीला मुंबई विमानतळानर ‘मी जावेद अख्तरची नात नाही’ असे लिहिलेला टी शर्ट घालून स्पॉट करण्यात आले. यावेळी उर्फीच्या हातात भगवतगीता देखील दिसली. उर्फीने अनेक वेळा सांगून देखील तिला जावेद अख्तर यांची नात असल्याचे म्हटले जात होते मात्र आता कोणताही प्रश्न विचारण्याआधीच उर्फीने घातलेल्या टीशर्टवरील उत्तराने सर्वांची बोलती बंद केली.

उर्फीचा विमानतळावरील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी उर्फीला तू आधी पूर्ण कपडे घालायला शिक असे म्हणत सल्ला दिलाय. तर अनेकांनी मॅडम आज पहिल्यांदा पूर्ण कपड्यात दिसल्या म्हणून तिचे कौतुक देखील केले आहे.


हेही वाचा – ऐन थंडीत Urfi Javedच्या हॉटनेसने नेटकरी घायाळ