urfi javed- महिलांनो पुरुषांच्या मागे धावण्यापेक्षा पैशांचा मागे धावा उर्फीचा भन्नाट सल्ला

बोल्ड कपड्यांबरोबरच बोल्ड विधानांसाठी ओळखली जाणाऱी मॉडेल उर्फी जावेद (Urfi Javed) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण ही चर्चा तिच्या कपड्यांबद्दल नसून तिने दिलेल्या अजब गजब सल्ल्याबदद्ल आहे.

urfi javed complaint against bjp leader chitra wagh women commission

बोल्ड कपड्यांबरोबरच बोल्ड विधानांसाठी ओळखली जाणाऱी मॉडेल उर्फी जावेद (Urfi Javed) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण ही चर्चा तिच्या कपड्यांबद्दल नसून तिने दिलेल्या अजब गजब सल्ल्याबदद्ल आहे. उर्फीने समस्त महिलांना पुरुषांच्या मागे धावण्यापेक्षा पैशांमागे धावा असा भन्नाट सल्ला दिला आहे.

उर्फीने नुकतीच एका सिने मॅगेझिनला मुलाखत दिली. यावेळी तिने आपले बालपण अत्यंत कष्टात गेल्याचे सांगितले. तसेच वडील आईला आणि मला खूप मारझोड करायचे. शिव्या द्यायचे याला कंटाळून मी दोनवेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचंही उर्फीने यावेळी सांगितले. तसेच लहानपणापासून मला फॅशनची आवड होती. मात्र मला त्याबद्दल फारस काही कळतं नव्हत. पण सगळ्यांच माझ्याकडे लक्ष जावं यासाठी मी नेहमीच वेगळ असं काहीतरी करायचं ठरवल्याचं उर्फीने या मुलाखतीत सांगितले. तसेच वडील माझा मानसिक आणि शारिरीक छळ करायचे यामुळे अनेकवेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक खुलासाही उर्फीने यावेळी केला .

एवढचं नाही तर फॅशनेबल दिसण्यासाठी मी वयाच्या १५ व्या वर्षी फोटोशूट केलं. ते एका प्रौढांच्या साईटवर प्रसिद्ध झालं. ते बघून लोक मला वेश्या म्हणू लागल्यांचही यावेळी उर्फी म्हणाली. त्याचबरोबर तिने आपलं बालपण नेहमी आर्थिक अडचणींचा सामना करण्यात गेलं. पण मी स्वता:ला कायम श्रीमंत समजत आले. म्हणूनच महिलांनी पुरुषांच्या मागे धावण्यापेक्षा पैशांचा मागे धावायला हवं. असाही सल्ला दिला. तसेच मला काही चादर अंगाला गुंडळून फिरायच नाही तर दाखवायचं आहे. ती माझी मर्जी आहे. असंही बोल्ड वक्तव्य उर्फीने केले.