आपल्या अतरंगी स्टाईलमुळे सतत चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदच्या अनोख्या स्टाईलचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. अनेकजण तिच्या हटके स्टाईलचं कौतुक करतात तर काहीजण तिला प्रचंड ट्रोल देखील करत असतात. मात्र, उर्फी कोणालाही न घाबरता सडेतोड उत्तर देताना दिसते. दरम्यान अशातच, उर्फीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ती एका मिस्ट्री गर्लला किस करताना दिसत आहे.
उर्फी जावेदचं या मिस्ट्री गर्लसोबत खास कनेक्शन
उर्फी जावेद नेहमीच तिच्या हटके बोल्ड लूकमुळे चर्चेत असते. अशातच गुरुवारी उर्फीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला ज्यामध्ये ती एका मुलीला किस करताना दिसत आहे. या मिस्ट्री गर्लचं नाव काजोल असून उर्फीने तिला देखील टॅग केले आहे. उर्फी आणि काजोलला अनेकदा एकत्र पाहिलं जातं. काजोल उर्फीची खास मैत्रिण असल्याचं म्हटलं जात आहे. अनेकजण उर्फी काजोलसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे.
टेलिव्हिजनपासून केली करिअरची सुरुवात
उर्फी जावेद अलीकडेच ‘बिग बॉस ओटीटी 2’ मध्ये पाहुणी म्हणून आली होती. उर्फी जावेदने 2016 मध्ये ‘बडे भैया की दुल्हनिया’ या शोमधून टीव्ही इंडस्ट्रीमध्ये तिच्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर तिने अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे. उर्फी जावेद इतर रिअॅलिटी शोमध्येही दिसली आहे.