घरमनोरंजनमी धार्मिक व्यक्ती नाही; शीख धर्माचा उल्लेख करत उर्फीने केलं नवं ट्वीट

मी धार्मिक व्यक्ती नाही; शीख धर्माचा उल्लेख करत उर्फीने केलं नवं ट्वीट

Subscribe

सोशल मीडिया स्टार उर्फी जावेद सध्या तिच्या कपड्यांमुळे वादात सापडली आहे. तिच्या कपड्यांवरून अनेकांनी तिला टार्गेट केले. सोशल मीडियावरचं नाही तर राज्याच्या राजकारणात आता उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांचा मुद्दा गाजतोय. यावरूनच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदला टार्गेट केले आहे. मागील अनेक दिवसांपासून दोघींमध्ये सध्या सोशल मीडियावरून शाब्दिक वाद सुरु आहे. हा वाद सुरु झाल्यापासून उर्फी ट्ववीटरवर प्रचंड सक्रिय असते. अनेकदा उर्फी सोशल मीडियावरुन विविध विषयांवर आपलं मत देखील मांडत असते.

उर्फीने शीख धर्माबद्दल केलं ट्वीट

- Advertisement -

नुकत्याच शेअर केलेल्या ट्वीटमध्ये उर्फीने शीख धर्माचा उल्लेख केला आहे. ज्यात तिने लिहिलंय की, “मी अजिबात धार्मिक व्यक्ती नाही पण मला गुरुद्वाराची संकल्पना खूप आवडते. या ठिकाणी लोकांना त्यांचा धर्म, जात, लिंग, रंग, श्रीमंती याबाबत न देतात. शीख आजही भक्तिभावाने लंगर चालवतात, हे कौतुकास्पद आहे, मला त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे.” असं उर्फीने ट्वीटमध्ये लिहिलंय.

या पूर्वी उर्फीने हिंदू आणि मुस्लिम धर्माबद्दल देखील ट्वीट केले होते. ज्यात ट्वीटसोबत तिने हिंदू धर्मातील जुने शिल्प व हिंदू स्त्रियांचा जुन्या काळातील पेहरावाचे फोटो शेअर केले होते.

- Advertisement -

तसेच मुस्लिम धर्माबद्दल तिने ट्वीट शेअर करत लिहिलं होत की, “मुस्लिम पुरुषांना वाटतं की ते त्यांच्या पत्नीचे मालक आहेत.” उर्फी अनेकदा तिचे मत सोशल मीडियावर मांडत असते. यामुळे अनेकजण तिचं कौतुकही करत असतात.

 


हेही वाचा :

‘पठाण’ ओटीटीवर प्रदर्शित होण्यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने दिले निर्देश

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -